कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
नवरात्रोत्सव कधी नऊ दिवसाचा असतो. एखाद्या वर्षी खंडेनवमी एका दिवशी आणि विजयादशमी दुसऱ्या दिवशी असते. कोणत्या वर्षी खंडेनवमी व विजयादशमी एकाच दिवशी असते. यावर्षी मात्र नवरात्रोत्सव दहा दिवसाचा आहे. घटस्थापना अर्थात शारदीय नवरात्रोत्सवास २२ सप्टेंबरला प्रारंभ होत आहे. ललित पंचमी २६ सप्टेंबरला आहे. १ ऑक्टोबरला आयुध नवमी, शस्त्रपूजा आहे तर २ ऑक्टोबरला विजयादशमी आहे. नवरात्रोत्सव घटस्थापना ते विजयादशमी असा अकरा दिवसाचा आहे. साधारणपणे, नवरात्रीचा उत्सव नऊ दिवसांचा असतो. पण या वर्षी तृतीया तिथी दोन दिवस राहणार आहे. २४ आणि २५ सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीय तिथी आहे. त्यामुळे, एक दिवस जास्त जोडला जाईल आणि यंदा नवरात्रीचा उत्सव दहा दिवसांचा असलेला हा योग फारच दुर्मिळ मानला जातो.
हिंदू पंचंगानुसार, शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. मात्र, यंदा ही तिथी २२ सप्टेंबरला येत असून त्यादिवशी देवीची स्थापना होईल. त्यानंतर, नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाईल, तर २ ऑक्टोबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा साजरा होईल.
साधारणपणे, नवरात्रीचा उत्सव नऊ दिवसांचा असतो. पण या वर्षी तृतीया तिथी दोन दिवस राहणार आहे. त्यामुळे, एक दिवस जास्त जोडला जाईल आणि यंदा नवरात्रीचा उत्सव दहा दिवसांचा असेल हा योग फारच दुर्मिळ मानला जातो. ज्योतिषाशास्त्रानुसार, तिथी वाढणे हे अतिशय शुभ मानले जाते. तिथी वाढली म्हणजे येणारा काळ सुख समृद्धी घेऊन येतो, असे म्हंटले जाते. धर्मशास्त्रातही तिथी वाढणे हा चांगले संकेत असल्याचे नमूद केले गेले आहे.
नवरात्रीत देवी दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. शैलपुत्रीपासून ते सिद्धीदात्रीपर्यंत प्रत्येक रुपाला वेगवेगळे महत्त्व आहे. या काळात भाविक उपवास करून देवीची आराधना करतात. या काळात भाविक उपवासाबरोबरच व्रत, जप, होम, हवन आणि देवीची भव्य आरास करतात. सोबतच, यादरम्यान जागर आणि देवीची आरतीही केली जाते.