कोल्हापूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील सर्व लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. या प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. लाभार्थींनी पुढील २ महिन्यांमध्ये ई-केवायसी पूर्ण करावे, नाहीतर त्यांच्या योजनेंतर्गत अतिरिक्त लाभ थांबविला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व लाभार्थींना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील शासन परिपत्रक शेअर करत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र व्यक्ती मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर शासनाने आता, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य” असं म्हणत नव्या नियमांसंदर्भातील पत्रकच जारी केलंय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती,” असं अदिती टकरेंनी म्हटलं आहे.
“ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे,” असंही अदिती तटकरेंनी म्हटलं आहे.
—————————————————————————————————-



