spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeमाहिती तंत्रज्ञानऑनलाईन गेमिंग : केंद्र सरकारची महत्त्वाची पावले

ऑनलाईन गेमिंग : केंद्र सरकारची महत्त्वाची पावले

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अलीकडच्या काही वर्षात ऑनलाईन गेम्स लोकप्रिय झाले आहेत. काहीजन या गेममध्ये सट्टा लावून खेळतात. यामध्ये त्यांचे नुकसान होते. या गेम्समधून काही फसवणूकीची प्रकरणे देखील उघड होत आहेत. त्यामुळे केंद्र  सरकारने या क्षेत्रास नियम लावण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.

या संदर्भात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंग उद्योगातील प्रतिनिधींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीत विशेष करुन ई-स्पोर्ट्स ( म्हणजे इंटरनेटद्वारे खेळले जाणारे स्पर्धेचे खेळ ) आणि मित्रांसोबत खेळले जात असलेल्या सोशल गेम्सच्या विकासावर चर्चा झाली.

वैष्णव यांनी स्पष्ट केले कि, केंद्र सरकारचा हेतू या गेमिंग क्षेत्रास प्रोत्साहन देण्यात आहेच परंतू या सोबतच याद्वारे सर्वसामान्य जनतेलाही कोणते नुकसान होऊ नये हे पाहिले जाणार आहे. त्यांनी असाही  सल्ला दिला आहे की गेमिंग कंपन्यांनी ग्राहकांनी लावलेल्या पैशांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आवश्यक सावधानता बाळगावी. 

उद्योग कायद्याचे पालन आणि सन्मान राखत, नियमांचे पालन करतानाच जनतेच्या पैशांचे संरक्षण खात्रीने व्हावे याची काळजी घेत जर हा उद्योग पुढे गेला तर त्याचे भविष्य उज्ज्वल होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • ऑनलाईन गेमिंगला सुरक्षित कसे बनवले जाऊ शकते ?

  • जे वापरकर्ते पैसे लावून खेळत आहेत त्यांच्या पैशाची सुरक्षा कशी केली जाऊ शकते ?

  • गेमिंग कंपन्या भारतीय कायद्याचे कोणत्या पातळीपर्यंत पालन करीत आहेत ? त्याची पडताळणी कशी केली जाईल ?

आज ऑनलाईन गेमिंग क्षेत्र देशभरात लाखो युवकांना रोजगार आणि उत्पन्न मिळवून देत आहे. तज्ज्ञांच्या मते जर या सेक्टरला योग्य दिशने पुढे आणले तर तरुणांना आणखी चांगल्या संधी मिळू शकतात. केवळ गेम खेळण्या पुरतेच मर्यादित न राहाता गेम डेव्हलपमेंट आणि तांत्रिक क्षेत्रात देखील हजारो रोजगार यामुळे पैदा होत आहेत.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments