टोकियो : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याची आज भव्य सुरुवात झाली. टोकियोत त्यांच्या स्वागताला उत्साहाचे वातावरण होते. भारताने अमेरिकेवर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर लगेचच या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे या दौऱ्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष लक्ष वेधले गेले आहे.
आज २९ ऑगस्ट रोजी मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांची टोकियोत वार्षिक शिखर परिषद होणार असून, त्यानंतर दोन्ही नेते शिंकानसेन बुलेट ट्रेनने सेंदाईकडे रवाना होणार आहेत. तेथे ते सेमीकंडक्टर प्लांटला भेट देतील. या भेटीकडे जगभराच्या नजरा लागल्या आहेत.
मोदींच्या जपान दौऱ्यातून मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवली जात आहे. भारत-जपान आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होणार, हे आता स्पष्ट होत आहे. दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढण्याची चिन्हे आहेत. अहमदाबाद–मुंबई हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पा पलीकडे जाऊन भविष्यात दोन्ही देश मिळून बुलेट ट्रेनच्या निर्मितीवर काम करू शकतात. भारताला पूर्वी E५ शिंकानसेन मिळण्याची अपेक्षा होती, ज्याचा कमाल वेग ताशी ३२० किमी आहे. या रचनेची प्रेरणा जपानच्या अल्फा-एक्स प्रायोगिक ट्रेनमधून घेतली गेली आहे. त्यामुळे भारतीय वाहतूक व्यवस्थेला नवी ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारताने अमेरिकेवर टॅरिफ लावल्यानंतर नवे राजनैतिक समीकरण घडताना दिसत आहे. अमेरिकेचा दबाव असूनही भारत रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवत आहे. दुसरीकडे, भारताने जपान, चीन आणि इतर देशांशी जवळीक वाढवली आहे. मागील काही वर्षांपासून चीन-भारत संबंध ताणलेले असले तरी अलीकडील घडामोडींनंतर या संबंधांत उब दिसत आहे.
मोदींच्या जपान दौऱ्यामुळे आशियातील नव्या धोरणात्मक समीकरणांना गती मिळणार असून, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या या पावलामुळे पोटदुखी होणं साहजिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
————————————————————————————————-