spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeपर्यावरणसिंगल युज प्लॅस्टिकचा वापर थांबवा

सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर थांबवा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लॅस्टिक टाळणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा. तसेच विविध कार्यालयांबरोबरच शासकीय, निमशासकीय कार्यालयात प्लॅस्टिक बॉटल टाळा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून २५ ऑगस्ट ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘१०० दिवस प्लॅस्टिक बंदी अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ‘ १०० दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर ’ या टॅग लाईनचा प्रचार, प्रसार करण्यात येणार असून या प्लॅस्टीक बंदी अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे अनावरण व माहिती परिपत्रकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार- या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग घ्या. अभियानात स्वयंसेवी संस्था व अधिकाधिक नागरिकांचा सहभाग घ्या. प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा. सूक्ष्म नियोजन करुन व विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियान यशस्वी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी अमोल येडगे – प्लास्टिकच्या अनावश्यक व वाढत्या वापरामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे भूमीगत वाहिन्या, चेंबर, गटारी, नाले तुंबल्यामुळे तसेच नदीमध्ये प्लास्टिक वाहून आल्यामुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तसेच मंदिरे, गड, किल्ले, उद्याने, रस्ते अशी सार्वजनिक ठिकाणे प्लास्टिक कचऱ्यामुळे विद्रूप होत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांच्या दरम्यान प्लास्टिक बाटल्यांचा वापर पूर्णपणे बंद केला असून याऐवजी कार्यालयात स्टीलच्या बाटल्या वापरण्यात येत आहेत.
प्लॅस्टिक बंदी अभियानात विविध ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांची कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, क्रीडा संस्था, माध्यमे, मंदिरे, उद्योजक, व्यापरी, हॉटेल, फेरीवाले, विविध संस्था, संघटना, विविध गट, बचतगट, अंगणवाडी, केटरींग, व्यावसायिक, फेरीवाले संघटना, एमआयडीसी, किरकोळ फळे, फुले, भाजीपाला विक्रेते, आदींच्या सहभागातून हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी प्लॅस्टिक विरोधी घोषवाक्य, पथनाट्य, रिल्स, पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
उपस्थिती – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्लॅस्टिक न वापरण्याबाबत उपस्थितांनी शपथ घेतली.
——————————————————————————————————
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments