कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या ताब्यात राहणार, या महत्त्वाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
साडेतीन वर्षापूर्वी शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे गट फुटून भाजप पक्षा सोबत सत्तेत सहभागी झाला. यांमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. तेव्हापासून शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या ताब्यात राहणार याबाबत न्यायालयीन लढा सुरु आहे. या न्यायालयीन लढ्याची तारीख पे तारीख सुरु झाले आहे.
या कालावधीत अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाला. सभागृहाचा कालावधी संपल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या परत महायुतीचे सरकार सत्तेवर आले. या प्रकरणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये सुरू असलेल्या संघर्षाला कायदेशीर निकषांवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
याआधी, १४ जुलै रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आली होती. त्यावेळी खंडपीठाने प्रकरण पुढील सुनावणीसाठी यादीत ठेवण्याचे निर्देश दिले होते आणि २० ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती. मात्र, अद्ययावत संगणक निर्मित यादीनुसार आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
———————————————————————————-



