spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeशासकीय योजनाकर्मचारी भविष्य निधी संगठनचा नवा नियम

कर्मचारी भविष्य निधी संगठनचा नवा नियम

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कर्मचारी भविष्य निधी संगठन (ईपीएफओ) ने १ ऑगस्टपासून एक महत्त्वाचा नवा नियम लागू केला आहे. यानुसार, युनिवर्सल अकौंट नंबर (युएएन) तयार करताना आता ‘फेस ऑथेंटिकेशन’ अनिवार्य करण्यात आलं आहे. हा नवीन नियम UMANG App (Unified Mobile Application for New-age Governance) च्या माध्यमातून लागू करण्यात आला आहे.

यापूर्वी, आधार ओटीपी किंवा बायोमेट्रिक पद्धतीने युएएन तयार करता येत होतं. मात्र, आता ईपीएफओ ने डिजिटायझेशनला प्राधान्य देत ‘फेस ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य केला आहे. त्यामुळे युएएन तयार करताना संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा चेहरा स्कॅन करून व्हेरिफाय करावा लागेल.

‘फेस ऑथेंटिकेशन’ ही एक डिजिटल ओळख पडताळणीची पद्धत आहे, ज्यामध्ये स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याद्वारे व्यक्तीचा चेहरा स्कॅन केला जातो आणि तो आधार डेटाबेसमधील माहितीशी जुळवून पाहिला जातो.

या नियमाचे फायदे:

  • फसवणूक कमी होणार: बनावट खाते किंवा चुकीच्या माहितीने युएएन तयार करण्यावर आळा बसेल.

  • सोपी व जलद प्रक्रिया: मोबाइलवरून थेट अकाऊंट तयार करता येईल, कार्यालयात जाण्याची गरज नाही.

  • डिजिटल इंडिया मोहिमेस चालना: सरकारच्या डिजिटल व पेपरलेस प्रक्रियेच्या दिशेने आणखी एक पाऊल.

वापरकर्त्यांना काय करावे : 

  • UMANG App डाउनलोड करावा लागेल-
  • त्यात ईपीएफओ सेवा निवडून, युएएन जनरेट करण्याचा पर्याय निवडावा लागेल.
  • आधार क्रमांक टाकून, फेस ऑथेंटिकेशनद्वारे ओळख पडताळणी करावी लागेल.

——————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments