कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्र सरकारने मागील पाच वर्षात केलेल्या विविध भरती प्रक्रियेत ३३ हजार,९५० उमेदवारांची निवड होऊ शकलेली नाही. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने घेतलेल्या विविध भरती प्रक्रियेत मागील पाच वर्षांत मुलाखतीला सामोरे गेलेल्या ५२ हजार,९१० उमेदवारांपैकी ३३ हजार,९५० उमेदवारांची निवड होऊ शकलेली नाही. म्हणजेच सुमारे ६४ टक्के उमेदवार मुलाखतीत अपात्र ठरले आहेत. याचा अर्थ केंद्रीय नोकरीत ३६ टक्के उमेदवार मुलाखतीत पात्र ठरले आहेत.
संघ लोकसेवा आयोग व अन्य केंद्रीय निवड संस्थेच्या माध्यमाद्वारे भरती प्रक्रिया राबविले जाते. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या विविध विभागात आवश्यक असणारे मनुष्यबळ लोकसेवा आयोग व अन्य केंद्रीय निवड संस्थेकडून घेतले जाते. या संस्था भरतीसाठी स्वातंत्र्य यंत्रणा राबवितात. केंद्रीय सेवेत नोकरी करणे सन्मानाचे असते. पगार, भत्ते, व अन्य सुविधा जास्त असतात. यामुळे केंद्रीय सेवेत दाखल होण्यासाठी इच्छुकांची संख्या लाखात असते. या निवडी विविध परीक्षा, मुलाखती घेऊन केल्या जातात. या परीक्षा आवघड असतात. मोठ्या संख्येतून नेमक्या उमेदवाराचीच निवड व्हावी यासाठी भरती प्रक्रिया तुलनेने अवघड असते.
केंद्रीय भरतीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या लाखात असते. त्यातून मुलाखतीस पात्र झालेल्याची संख्या हजारात असते. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षात केंद्राच्या विविध नोकर भरतीत अर्ज केलेल्यांपैकी ५२ हजार,९१० उमेदवार पत्र ठरले. यापैकी ३३ हजार,९५० उमेदवारांची निवड होऊ शकली नाही.
————————————————————————————-



