प्रसारमाध्यम न्यूज
रेल्वे स्थानक होणार शेतात आणि फक्त एका झाडाचा परतावा मिळणार कोटीत. अशी वास्तवता एका शेतकऱ्याला अनुभवण्यास मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खरशी गावातून रेल्वे जाते. या खरशी गावात मध्यरेल्वे विभागाला स्थानकासाठी जागा पाहिजे होती. ही जागा केशव शिंदे यांच्या पिकाऊ शेत जमिनीच्या रूपाने रेल्वे विभागाला मिळाली. या शेतात पिकांच्या बरोबरच विहीर, झाडे होती. याचा मोबदला रेल्वेने शिंदेना दिला. मात्र फक्त एका झाडाचा प्रश्न राहिला. त्या एका झाडाच्या मोबदल्यासाठी ८७ वर्षाचे शिंदे उच्च नायालयात गेले. अनेक वर्षे लढले. अखेर न्यायालयाने त्या झाडाचा मोबदला एक कोटी रुपये देण्याचा निकाल मध्य रेल्वे विभागाला दिला. रेल्वेनेही ही रक्कम न्यायालयात जमा केली. मात्र शिंदेनी ही मान्य केले नाही. तर मुल्यांकन केल्यानंतर त्या झाडाचे मूल्य ४ कोटी ९७ लाख रुपये होते असे शिंदे यांच्या वकील अंजना राऊत नरवडे यांनी पत्रकारांना सांगितले. ही रक्कम आणि पाईपलाईन तसेच अन्य झाडांचे मूल्यांकनानुसार रक्कम मिळावी यासाठी शिंदे यांनी न्यायालयीन लढा सुरूच ठेवला आहे.
केशव शिंदे यांची पुसद तालुक्यातिल खरशी गावात २.२९ हेक्टर शेत जमीन आहे. वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जाते. म्हणूनच मध्य रेल्वेने त्यांची जमीन संपादित केली. शिंदे यांच्या शेतात रक्तचंदणाच्या झाडाबरोबरच येन, खैर यासारख्या आडजातीची आठ ते दहा झाडे होती. शेतात भूमिगत पाईपलाईनही होती. शेतजामिनिवर आंब्यासह इतर फळबागही होती. याचा मोबदला मिळाला. शेतात असलेल्या विहीरीचाही मोबदला मिळाला. पण रक्तचांदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नव्हता. यांचा मोबदला मिळावा यासाठी २०१४ पासून शिंदे जिल्हाधिकारी, वनविभाग, रेल्वे, सिंचन या विभागांशी पत्रव्यवहार करताहेत. पण त्यांना मोबदला मिळाला नाही म्हणून शिंदे यांनी आठ वर्षानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. एकाच वर्षात शिंदे यांनी हा खटला जिंकला. त्यांना याचा मोबदला मिळाला. मात्र रक्त चनंदनाच्या झाडाचे अद्याप मूल्यांकन झाले नाही. मूल्यांकनाच्या आधी एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने रेल्वेला दिले. त्यानुसार रेल्वेने १ कोटी रुपये उच्च न्यायालयात जमा केले. पण मूल्यांकनांनंतर रक्तचांदनाच्या झाडाची किंमत जवळपास ५ कोटी रुपये होऊ शकते, असे याचिकाकरत्याच्या वकील अंजना राऊत नरवडे यांनी पत्रकारांना सांगितली. रेल्वेने देखील मूल्यांकनामूळेच मोबदला दिला नव्हता असे या प्रकरणातील रेल्वेच्या वकील निरजा चौबे सांगतात.
शिंदे यांनी आंध्र प्रदेशातून रक्तचंदनाचे दर मागविले आहेत तसेच खासगी अभियंत्यांकडून देखील या झाडाचे मूल्यांकन केले आहे. त्यानुसार रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्य ४ कोटी ९४ लाख रुपये होतात. रक्तचांदनाच्या झाडांची ४ कोटी ९४ लाख रुपये अधिक व्याज इतकी रक्कम रेल्वेने देण्याची मागणी शिंदेनी केली आहे. भूमिगत पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदलाही अजून प्रलंबित आहे तोही याचिकाकरत्याने मिळावा अशी मागणी केली आहे.
हे झाड आहे, रक्त चंदनाचे. या झाडाचे वय आहे शंभर वर्षे. या झाडाचे वय वाढ्ल्याने झाडाची किंमतही वाढली. केशव शिंदेचेही वय आहे ९४ वर्षे. ते मुलांना घेऊन हा खटला लढताहेत. मुळात शिंदे यांना ते झाड रक्त चंदनाचे आहे हे माहीतच नव्हते. जमीन संपादित होण्याआधी या जमिनीचा सर्वे करायला रेल्वेचे काही कर्मचारी आले होते. ते कर्मचारी मूळचे आंध्रप्रदेशातील होते. त्यावेळी त्या कर्मचाऱ्यानीच हे झाड रक्त चांदनाचे असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे इतक्या वयातही शिंदे हा खटला नेटाने लढत आहेत आणि याला यशही येत आहे.