कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर व्यवस्थापनासाठी आयआयटीचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि आयआयटी मंडी यांच्यात करार होणार आहे.त्यामुळे जिल्ह्यात हवामानाचे सूक्ष्म आणि परिसर निहाय अंदाज मिळणार आहे.
अत्याधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. कोल्हापूर, इचलकरंजी शहरासह जिल्ह्यातील १२९ गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. २०१९ आणि २०२१ यावर्षी पूरबाधित गावांची संख्या ४०० हून अधिक होती. दरवर्षी पूर येत असला तरी जुलै ते ऑगस्ट महिन्यातील काही दिवसच होणारा पाऊस जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी बिघडवून टाकतो. या महापुराने दरवर्षी प्रचंड हानी होते. जिल्ह्याच्या विकासावरती त्याचा परिणाम होतो यावरील नियंत्रणासाठी जिल्ह्यात आयआयटी मंडीच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. 
विकसित केलेली हवामानाची प्रणाली वापरण्यात येणार आहे. सूक्ष्म परिसर निहाय अंदाज च्या प्रणालीमुळे हवामानाचा अभ्यास होणार आहे. सध्या जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होईल असा अंदाज दिला जातो. नेमके कोणत्या भागात पाऊस होईल, कधी होईल, किती होईल याचा अंदाज तंत्रज्ञानामुळे मिळणार आहे. पाऊस आला की, त्याचे पाणी कोणत्या परिसरात पसरेल, कसे पसरेल, किती वेळात पसरेल याचाही अंदाज मिळणार आहे. कोल्हापूर शहर त्याप्रमाणे अंदाज स्थितीतील आणि कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे



