अंबाबाई मंदिर परिसर उद्यापासून विद्युत दिव्यांनी उजळणार….

0
168
Google search engine

देशभरातील अनेक प्रमुख देवस्थानच्या, तसेच मंदिरांच्या परिसरात ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून भक्तिगीते, देवीचे स्तोत्र, आरती लावली जात आहे. तिरुपती देवस्थानमार्फत तिरुमला डोंगरावर बालाजीचे गीत ध्वनी यंत्रणेच्या माध्यमातून लावले जाते. हाच अनुभव आता कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांना येणार आहे.

ध्वनीयुक्त खांब उभारणीचे काम मुंबईतील कृष्णा रेफ्रिजरेशन कंपनीने केले आहे. या कंपनीने अयोध्या येथील राम मंदिर, मधुरा यासह मुंबईत अशा पद्धतीचे काम केले आहे.हेरिटेज बल्बचे खांब उभारण्याचे काम पवन क्विक सर्व्हिसेस कंपनीने केले आहे.


राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची ही मूळ कल्पना आहे. त्यासाठी त्यांनी ध्वनीयुक्त हेरिटेज खांबांसाठी २ कोटी ६५ लाखांचा खर्च आला असून, हा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here