spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

HomeUncategorizedसोनं सगळ्यांची झोप उडवणार : तज्ज्ञांचं मोठं भाकीत

सोनं सगळ्यांची झोप उडवणार : तज्ज्ञांचं मोठं भाकीत

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

सोन्याबाबत मोठी बातमी आली आहे. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की, सोने खूप महाग आहे असे अनेकांना वाटत होते. मात्र, सोन्याचे दर आणखी खूपच महाग होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम एक लाख रुपयांच्या आसपास राहील असा तुमचा अंदाज असेल तर तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतामुळे तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

सोन्याचा दर गाठणार दोन लाखांचा टप्पा…

सोन्याचा दर प्रति तोळा लवकरच दोन लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव लवकरच प्रति १० ग्रॅम २,१८,५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. स्विस एशिया कॅपिटलचे जुर्ग केनर यांनी  दिलेल्या एका मुलाखतीत कमोडिटी मार्केटबद्दल ही मोठी भविष्यवाणी केली आहे. गाठण्यासाठी किमान 5 वर्षांचा अवधी लागणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. याचा अर्थ पुढील 5 वर्षात देशातील बहुमतांशी जण सोने खरेदी करू शकत नाही. संवाद साधताना तज्ज्ञांनी सांगितले की, सोन्याचा भाव प्रति औंस ८००० डॉलर्सच्या नवीन विक्रमी किमतीपर्यंत पोहोचू शकतो. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये दीर्घकाळात मोठी वाढ दिसून येईल, तर कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

सोन्याचा दर कसा गाठणार दोन लाखाचा टप्पा?

सोन्याचा दर प्रति औंस ८००० डॉलरपर्यंत गेल्यास भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत किती होईल?

स्विस एशिया कॅपिटलचे जुर्ग केनर म्हणाले की, सोन्याच्या किमतीतील वाढ सुरूच राहील. प्रथम, थोडीशी सुधारणा दिसून येईल. जिथे सोन्याचे भाव प्रति औंस $२८०० ते $२९०० च्या पातळीवर येऊ शकतात. यानंतर, जुलै २०२५ पर्यंत सोन्याचे भाव प्रति औंस ३५०० डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पुढील ५ वर्षांत सोने प्रति औंस ८००० डॉलरपर्यंत पोहोचू शकते.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments