अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी काढलेल्या वटहुकुमाप्रमाणे 250 वर्षानंतर आता इंग्रजी अमेरिकेची अधिकृत भाषा होणार आहे. या वटहुकुमाप्रमाणे आता संघराज्यासाठी काम करणा-या सरकारी कार्यालयांना आता इंग्रजी येत नसलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या भाषेत सेवा उपलब्ध करून देण्याची गरज नाही. सर्व सरकारी काम जलद होणेसाठी व राष्ट्रीय एकता एकसंधपणे वाढीस लागणे हा यातील मूख्य हेतू असल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले.

मागील दोन्ही राष्ट्रीय निवडणूकादरम्यान डोनाल्ड ट्रंप यांनी प्रचारा दरम्यान इंग्रजी भाषेच्या वापराबद्धल आग्रही भूमिका घेतली होती. ‘ कोणीही रेफ्युजी म्हणून देशात येताना आपल्या भाषा घेवून येतात व त्यांना इंग्रजी येत नसल्याने सर्वत्र गोंधळ माजतो.हे चालणार नाही असे बजावले होते.
दर 5 अमेरिकन्स मागे एक जण इंग्रजीशिवाय इतर भाषा बोलणारा असतो.इंग्रजी नंतर स्पॅनीश ही भाषा अमेरिकेत सर्वाधिक बोलली जाते.मध्य व दक्षिण अमेरिकेतील बहुसंख्य देश स्वातंत्र्यापूर्वी स्पॅनिश नियंत्रणाखाली होते. अमेरिकेच्या 340 दशलक्ष लोकसंख्येपैकी 68 दशलक्ष लोक इंग्रजी सोडून इतर भाषा बोलणारे आहेत.
देशांच्या अधिकृत भाषेचा विचार केल्यास जगभरात एकूण 180 देशांनी कोणती तरी एक भाषा अधिकृत भाषा म्हणून जाहीर केली आहे.