पन्हाळा प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य पुढच्या काळात देखील नंबर एकला राहण्यासाठी अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली भुमिका बजावेल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पन्हाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल कलश यात्रेचे उद्धाटन प्रसंगी मुश्रीफ बोलत होते.
मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्याला आज ६५ वर्षे पुर्ण होत आहेत.या कालावधीत ज्या लोकांनी हे राज्य वाढविण्यासाठी योगदान दिले आहे.त्या सगळ्यांना अभिवादन करण्य़ासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मंगल कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व प्रथम पुलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेंध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. यानंतर ऐतिहासिक ठिकाणाहुन आणलेली माती, पंचगंगा,चित्री आदी नद्यांचे आणलेले पाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कलशामध्ये ओतण्यात येवुन यात्रेला सुरुवात झाली.यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की,एखाद्या राजाने रयतेसाठी तेही सर्वजाती धर्मांला घेवुन कसे राज्य करावे यांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. रायगड नंतर महाराज पन्हाळ्यावर जास्त दिवस वास्वव्यास होते. त्यामुळे पन्हाळगडाच्या मातीच्या कणाकणात छत्रपती शिवाजी महाराजासह मावळ्यांचा इतिहास रुजला आहे.त्यामुळेच या मंगल कलेश यांत्रेचा शुभांरभ पन्हाळा येथुन करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य पुढच्या काळात देखील नंबर एकला राहण्यासाठी अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली भुमिका बजावेल असे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. वीर बाजीप्रभु आणि नरवीर शिवा काशीद यांना अभिवादन करुन यात्रा कोल्हापूर कडे मार्गस्थ झाली. यावेळी यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस लतिफ तांबोळी, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील,के.डी.सी.सी चे संचालक रणवीरसिंग गायकवाड,भैय्या माने,आदिल फरास तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.