त्याचा जन्म अमेरिकेतला आहे आणि वय आहे 8 महिन्यांच. त्याचे वजन आहे 75 किलो व अडीच फूट (30 इंच ) उंची आहे. त्याची किंमत आहे 50 कोटी रूपये. हा जन्मला आहे दुर्मीळ कोल्हा आणि काॅकेशियन शेफर्ड यांच्या संकरातून व ‘कॅडॅबाॅम्ब ओकामी’ हे त्याचे नाव आहे.
बंगळुरू येथील नामवंत डाॅग ब्रीडर एस .सतीश यांनी 50कोटी रूपये किमतीच्या कॅडॅबाॅम्ब ओकामीस आयात केलं आहे. एस.सतीश हे ‘इंडीयन डाॅग ब्रीडर्स असोसिएशन चे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडे 150 पेक्षा जास्त संकरीत कुत्री आहेत. 30 मिनिटाकरिता त्यांचा ‘शो’ त्यांना मिळवून देतो जवळपास 2200 पाऊंडस् (2 लाख 48 हजार रूपये) आणि 9000 पाऊंडस् ( दहा लाख रूपयांपेक्षा जास्त) 5 तासांच्या शो साठी. सतीश फिल्म्सच्या प्रिमियर साठीही देतात.

या कुत्र्याची जात्याच वृत्ती संरक्षणाची आहे. रशिया च्या सीमेवर असलेल्या कमी तापमानाच्या थंड जाॅर्जिया, आर्मे निया, अझरबैजान व रशियाचा काही भाग येथे याचे मुळ आहे. मेंढपालांच्या मेंढरांच्या रक्षणासाठी ख्याती असलेले भलेथोरले शेफर्ड कुत्रे व कोल्हा यांच्या संकरातून घडलेली ही नवी जात आहे. भारतामधे लॅब्रेडाॅर रिट्रीव्हर, जर्मन शेफर्ड, फ्रेंच बुलडाॅग, पाॅमेरीयन, राॅटवीलर, तिबेटच्या मॅस्टीफ या लोकप्रिय संकरीत कुत्र्यांच्या काही जाती आहेत.
एस.सतीश यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या एका व्हिडिओ क्लीपने 3 दशलक्ष व्ह्युज मिळवले.