कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
दुकानदार, छोटे व्यापारी कामगारांसाठी नवीन पेन्शन योजना सुरु करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पेन्शन फॉर ऑल स्कीम या नावाने सर्वसामान्य नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याच्या संकल्पनेला अंतिम टप्प्यात नेले असून ही योजना २०२५ सालचे अखेरीस प्रत्यक्षात आणण्याचे संकेत आहेत.
केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाकडून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी धोरणात्मक पातळीवर हालचाली सुरू असून येत्या काही महिन्यातील प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. पेन्शन फॉर ऑल स्कीम या नव्या पेन्शन योजनेची खास बाब म्हणजे योगदान करणाऱ्या व्यक्तीस केवळ किमान रक्कमच नव्हे तर अतिरिक्त बचतही आपल्या पेन्शन खात्यात जमा करण्याची मुभा असणार आहे. म्हणजेच जर एखादा नागरिक दरमहा ३,००० रुपये नेहमी ते योगदान करत असेल आणि त्याच्याकडे एकावेळी तीस हजार किंवा पन्नास हजार रुपये अतिरिक्त रक्कम उपलब्ध असेल तर तो ती रक्कम देखील पेन्शन फंडात भरू शकतो. यामुळे पेन्शन कालावधी सुरू करण्याचा पर्यायही स्वतःच्या गरजेनुसार निवडता येणार आहे.
या पेन्शन योजनेत कोणत्याही प्रकारची सक्ती नाही. कोणत्याही व्यक्तीस रोजगाराच्या अटीविना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजेच जर कोणी स्वतःचे किराणा दुकान चालवत असेल, गॅरेज, भाजी विक्री किंवा इतर कोणत्याही प्रकारचा छोटा व्यवसाय करत असेल आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता म्हणून पेन्शन यांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यालाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्ष ठेवण्यात आली असून त्यानंतर कोणत्याही वयाचा नागरिक स्वतःच्या पसंतीनुसार योगदान देऊ शकतो