ब्रिटन व आयर्लंड च्या दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट मंत्री एस. जयशंकर लंडन मधील चॅथम हाऊस ‘थिंक टॅंक’ बैठक संपवून गाडीत बसत असताना , भारतविरोधी घोषणा देत असलेल्या काही खलीस्तानी समर्थकांपैकी एक परराष्ट्रमंत्र्यांच्या गाडीसमोर आला व तेथे त्याने भारताचा राष्ट्रध्वज फाडला. ही संतापजनक घटना घडली तेव्हा लंडन पोलिस समोरच होते. परंतु त्यांनी केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतली आणि नंतर राष्ट्रध्वज फाडणाऱ्या खलीस्तानी समर्थकास राष्ट्रध्वज फाडल्यानंतर बाजूस नेले . त्या नंतर परराष्टमंत्र्यांचा ताफा रवाना झाला. या पूर्वी ही खलीस्तानी समर्थकांच्या वादग्रस्त कृत्यांचा वेळी ब्रिटनने पक्षपाती भूमिका घेतल्याचे दिसते. मार्च 2023 मध्ये भारतीय हायकमिशन वर खलीस्तानी समर्थकांनी हल्ला केला होता त्यावेळी तेथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. ब्रिटनच्या पोलिसाना स्वतंत्र राष्ट्राच्या राष्ट्रध्वजाचे महत्व माहिती नाही व त्यांचे खलीस्तान च्या मागणीस समर्थन आहे असा अर्थ यातून काढायचा का?
दरम्यान चॅथम हाऊस येथील ‘थिंक टॅंक’ बैठकी दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशकर यांनी सांगितले की काश्मीर प्रश्नी भारत व पाकिस्तान सोडून इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप मान्य नाही. काश्मीर मधील अडचणी 370वे कलम रद्द झाल्यावर सुटत आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. काश्मीर मधील निवडणुकामध्ये काश्मिरी लोकानी मोठ्या संख्येने भाग घेवून सामाजिक परिस्थिती कशी सुधारली आहे हे ही दाखवून दिले आहे.

परंतु (संपूर्ण काश्मीरचा) प्रश्न भारताच्या नियंत्रणात नाहीत. कारण काश्मीरचा काही भूभाग पाकिस्तानने बेकायदेशीर रित्या बळकावला आहे व या साठी पाकिस्तान अनधिकृत रित्या बळकावलेला पाकव्याप्त काश्मीर हा भाग कधी सोडणार आहे याची भारत प्रतीक्षा करत आहे. हा काश्मीरचा भाग पाकिस्तानने परत केला की काश्मीर प्रश्न पूर्णपणे सुटेल असे सडेतोड उत्तर त्यांनी एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नास दिले. भारत आणि अमेरिकेच्या संबंधा बाबत अमेरिकेस सध्या मान्य होत असलेले बहूकेंद्री जग आमच्या धोरणांशी सुसंगत आहे असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी क्वाड (QWAD) या अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया व जपान या 4 देशांच्या व्यवस्थित सुरू असलेल्या लष्करी युती चा उदाहरण म्हणून उल्लेख केला. भारत चीन यातील संबंध हे वेगळे असून दोन्ही देशांच्या सीमावरील शांतता महत्वाची आहे. ब्रिटनशी मुक्त व्यापार करारा बद्धल आपण आशावादी आहोत असे सावध मत त्यांनी व्यक्त केले