spot_img
सोमवार, ऑक्टोबर 13, 2025

9049065657

HomeUncategorizedदिल्ली सर्वात प्रदूषित! भारत जगातील प्रदूषित देशात ५ व्या क्रमांकावर!! जगातील...

दिल्ली सर्वात प्रदूषित! भारत जगातील प्रदूषित देशात ५ व्या क्रमांकावर!! जगातील सर्वात प्रदूषित २० शहरात १३ शहरे भारतातील !!!

भारतातील ३५% शहरामध्ये वार्षिक पार्टीक्युलेट मॅटर चा स्तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइज़ेशन ने प्रमाणित केलेल्या स्तरांपेक्षा १० पटीने जास्त आहे. या यादीत २०२३ मध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर तर २०२४ मध्ये पाचव्या क्रमांकावर होता. या वायु प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुष्यमान ५.२ वर्षानी घटू शकते. श्वसनाचे विकार, त्वचेचे विकार, कर्करोग, ऋदयरोग होऊ शकतात. औद्योगिक उत्सर्जनाने , कोळसा जाळल्याने व वाहनांच्या धूराने भारतीय शहरे कोंडून गेली आहेत.

गत वर्षी प्रकाशित लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थच्या अहवालानुसार दरवर्षी भारतात लाखोंच्या संख्येने मृत्यू होतात. २००९ ते २०१९ पर्यन्त प्रदूषणामुळे १५ लाख मृत्यू झाले आहेत. जागतिक प्रदूषण यादीत २० शहरामध्ये आशियातील – भारत १३ शहरे, पाकिस्तान ४ शहरे , चीन मधील एक शहर व कझाकस्थान मधील एक अशी १९ शहरे समाविष्ट आहेत . आणि आशियात नसलेले २० शहरापैकी एकमेव बाहेरचे शहर म्हणजे मध्य आफ्रिकेतील चाड हे शहर आहे.

आसाम आणि मेघालय राज्यांच्या सीमेवर असलेल्या बायर्नीहाट मधील प्रदूषण लोखंड , पोलाद, डीस्टीलरी या मुळे आहे. दिल्ली शहरात हिवाळ्यात वायु प्रदूषण जीवघेणे बनते. तसेही वर्षभर वायु प्रदूषण दिल्लीला भेडसावतेच . आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागार सौम्या स्वामिनाथन यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणले आहे की आता डेटा उपलब्ध आहे परंतु कारवाईत आपण कमी पडत आहोत. स्वयंपाकासाठी इंधन म्हणून कोळसा – लाकूड वापरू नये म्हणून सध्या एक सिलेंडर अनुदानित आहे आता एलपीजीच्या दुसऱ्या सिलेंडरला ही अनुदान द्यावे लागेल म्हणजे प्रदूषण पातळी अजून कमी होईल. हवा प्रदूषित करणाऱ्या वाहनावर दंड आकारणे , सार्वजनिक वाहतुकीची साधने वाढवणे व खाजगी वाहने कमी करणे या सह प्रदूषण टाळणे साठी उद्योग आणि बांधकाम चालू असलेल्या स्थळांनी उत्सर्जन कमी करणे साठी उपकरणे बसवली पाहिजेत.

F

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments