केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि अमेरिकन सरकारचे व्यापार प्रतिनिधि जेमीसन ग्रीर यांच्यातील बैठकीनंतर पीयूष गोयल यांनी आपण आगामी बैठकीबाबत आशावादी आहोत असे सांगितले व सध्याची चर्चा योग्य मार्गाने चालली असल्याचे सूचित केले. तसेच ही द्विपक्षीय व्यापारी चर्चा ‘भारत प्रथम ‘, ‘विकसित भारत’ आणि दोन राष्ट्रामधील व्यापक धोरणात्मक द्विपक्षीय व्यापार या मार्गदर्शक तत्वाद्वारेच चालली आहे असे सांगितले.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आधी अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लूटनिक यांनाही अमेरिकेत भेटले होते. तेथे द्विपक्षीय व्यापार करारात वस्तु व सेवा यातील व्यापार वाढवणे, दोन्ही देशांच्या मार्केट्स मध्ये अधिकाधिक क्षेत्रात प्रवेश करणे, आयात कर कमी करणे व सपलाय चेनस एकत्र करणे याचा समावेश होता. मध्यंतरीच्या पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका भेटीत त्यांनी व अमेरिकन राष्ट्रपति ट्रम्प यांनी दोन्ही देशातील व्यापारातील आयात करा बाबत चर्चा करून ऑक्टोबर पर्यन्त अंतिम स्वरूप द्या असे सांगून २०३० पर्यन्त दोन्ही देशातील व्यापार दुप्पट करण्याचे ठरवले.तशी अमेरिकेची भारत आकारत असलेल्या कराच्या दराप्रमाणे दर आकारणी करणेची तारीख एप्रिल २, २०२५ अशी आहे. याआधी ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्या पासून अनेक वेळा त्यांनी भारताच्या आयात करांवर टीका केली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीत ट्रम्प असेच आयात कर भारतातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूवर लावण्यात येतील असे म्हणाले होते.

परंतु आजून चर्चा सुरू आहे व भारत अमेरिकेशी असणारे व्यापरिक संबंध दृढ करत आहे असे भारताचे वाणिज्य सचिव सुनील बरथ्वाल यांनी म्हणले आहे. या बाबतीत प्रसिद्ध ‘भारतीय जुगाड ‘ सुरू झाला आहे. वाणिज्य मंत्रालयाने चीन मधून येणाऱ्या वस्तु व चीनी सर्विसेस यांना लक्ष्य करण्याचे ठरवलेले दिसते. त्यामध्ये यातील चीन मधून व इतर देशातून भारतज्या वस्तु अथवा सेवा आयात करतो त्या ओळखून त्या अमेरिकेकडून मिळत असल्यास अमेरिकेकडून आयात करायच्या व आपली निर्यात सुरू ठेवायची असे ठरत आहे असे इंडियन एक्सप्रेसने म्हणाले आहे . आहे. ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणामुळे संपूर्ण जग आर्थिक अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. एकामागून एक असे पूर्वीचे अमेरिकेचे व्यापारी धोरण बदलून टाकणारे निर्णय ट्रम्प जाहीर करत आहेत व अनेक वेळा त्याची मुदत ही वाढवत आहेत. कॅनडा, मेक्सिको, चीन, भारत, जपान, कोरिया, युरोपियन राष्ट्र समूह असे अनेक देश त्यामुळे हैराण झाले आहेत. अनेक देश अमेरिका जाहीर करेल तेव्हढे कर अमेरिकन वस्तुवर जाहीर करून पाहत आहेत. हे व्यापार युद्ध ट्रम्प दोन पावले पुढे व एक पाऊल मागे आशा बिझीनेस तंत्रामुळे नक्की कोणत्या पातळीपर्यन्त खेचणार याविषयी कोणीच भाकीत करू शकत नाही .



