एलोन मस्कची ‘स्टार लिंक’ भारतीय इंटरनेट जगतात दाखल ,जिओ आणि भारती एयरटेल बरोबर करार. वेग व प्रसार वाढणार!

0
153
Google search engine

जिओ व भारती एयरटेल या इंटरनेट पुरवणा-या भारतीय कंपन्या उपग्रहाद्वारे ‘जलद’ इंटरनेट सेवा देणाऱ्या एलोन मस्कच्या अमेरिकन टेक जायंट “स्टार लिंक शी करारबद्ध होत आहेत त्यामुळे भारतातील मायजाळचे – इंटरनेटचे विश्व बदलून जाणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित होण्या आधी भारतीय कायदेकानून च्या संमतीच्या मायजलातून त्यांना पार व्हावे लागेल. या दोन्ही ‘डील’ना सरकारची परवानगी लागेल.

भारतात इंटरनेटचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. तरी देखील शहरी आणि ग्रामीण पातळीवर फरक हा आहेच. ग्रामीण मध्ये इंटरनेटची गती कमी आहे व सहज ‘ॲकसेस’ही! हे चित्र आता बदलेल. ‘स्टार लिंक’च्या दरा’ विषयी भारतीय इंटरनेटच्या ‘युजर्स’ न उत्सुकता लागली आहे. ही यंत्रणा भुतान मध्ये २३ -१०० एमबीपीएस स्दपीड साठी दरमहा रु ३००१ मध्ये ‘लाइट’ युजर्स साठी व रु.४२०० ‘स्टँडर्ड’ रेसिडेन्शियल युजर्स साठी उपलब्ध आहे. भारतांसाठी त्यांचे दर लवकरच जाहीर होतील .

स्टार लिंक चे उपग्रह पृथ्वीच्या खालील कक्षेत स्थिर असल्याने त्यांचे द्वारे इंटरनेटची उपलब्धी काही क्षणात होऊ शकते व वेगही भरपूर असू शकतो. भारतात सध्या ७०० दशलक्ष लोकाकडे अधिकृत इंटरनेट सेवा नाही .ग्रामीण भागात इंटरनेट टॉवर्स किंवा भूमिगत केबल चे जाळे पसरवणे जिकिरीचे व वेळखाऊ आहे त्यामुळे उपग्रहामार्फत मार्फत इंटरनेट सेवा हेच उत्तर आहे. त्यामुळेच स्टार शिप ला व्यवसायिक स्कोप भरपूर राहील २२० एमबीपीएस पर्यन्त इंटरनेटचा वेग उपलब्ध करून देत असल्याने ग्रामीण भागातील इंटरनेट ‘ॲकसेस’ झपाट्याने सुधारेल.

स्टार लिंक चे असे तब्बल ७००० उपग्रह इंटरनेट ‘रिले’करीत आहेत व दर ५ वर्षानी हे नेटवर्क अपडेट व डबल करणेचे मस्क यांचे आश्वासन आहे यावरून ही सर्विस वेगवान व दर्जेदार असणार हे नक्की. यासाठी स्टार लिंक डिश व ‘राऊटर’ ची आवश्यकता असेल.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here