spot_img
शनिवार, नोव्हेंबर 8, 2025

9049065657

Homeकलासंपूर्ण हिंदी कॉमेडी करणारा पहिला भारतीय

संपूर्ण हिंदी कॉमेडी करणारा पहिला भारतीय

न्यूयॉर्कच्या मैडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये झाकीर खान चा शो

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित मैडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या कार्यक्रमात हिंदीत संपूर्ण स्टॅंड‑अप कॉमेडी सादर करणारे पहिले भारतीय कॉमेडियन म्हणून झाकीर खान यांनी इतिहास रचला. झाकीर खान न्यूयॉर्कमध्ये हिंदी भाषेत स्टँड‑अप शोचे हेडलाइनर बनणारे पहिले भारतीय कलाकार ठरले आहेत. हा कार्यक्रम पाहण्यासाठी १६ हजार रसिक उपस्थित होते. 

कॉमेडियन झाकीर खान ३७ वर्षाचे आहेत. ते मुळचे इंदौरचे आहेत.  त्यांनी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये कॉमेडी पूर्णपणे हिंदीमध्ये सादरीकरण केले. असे सादरीकरण करणारे खान पहिले भारतीय कॉमेडियन आहेत. खान  “मनपसंद”, “हक से सिंगल” आणि इतर विशेष कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.
न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये प्रेक्षकांनी झाकीर खान यांना उभे राहून दाद दिली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “@thegarden कडून टाइम स्क्वेअर न्यू यॉर्क टेक-ओव्हरपर्यंत उभे राहून दाद-भाई अजिंक्य आहे.”
संध्याकाळी, सहकारी विनोदी कलाकार हसन मिन्हाज झाकीरला पाठिंबा देण्यासाठी स्टेजवर दाखल झाले. त्यांनी “जगभरातील विनोदासाठी एक ऐतिहासिक रात्र” असे संबोधले. त्यांनी इंस्टाग्रामवर एक कॅरोसेल पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, “जगभरातील विनोदासाठी एक ऐतिहासिक रात्र! काल रात्री मला माझा भाऊ @zakirkhan_208 उर्फ झाकीर भाई @thegarden ला पूर्णपणे हिंदीमध्ये हेडलाइन करणारा इतिहासातील पहिला विनोदी कलाकार बनताना दिसला. तो कथाकथन आणि कविता अशा प्रकारे एकत्र करतो की, ज्यामुळे विनोदाचा प्रकार मी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या ठिकाणी पोहोचत आहे. मला असेही वाटते की माझे पालक त्याला माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतात (मला ते मान्य आहे).” याशिवाय अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनंदेखील झाकीर खानसाठी पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे. 
यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये झाकीरने लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण केले होते. तेथे सादरीकरण करणारा जगातील पहिला आशियाई विनोदी कलाकार बनून इतिहास रचला होता. या रात्रीने भारतीय स्टँड‑अप आणि हिंदी भाषिक कलाचरणाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. थेट संवाद, देसी अंदाज आणि सांस्कृतिक भावनेने तो अनुभव मान्य झाला.

—————————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments