झहीर खान-सागरिका झाले आई-बाबा : सोशल मीडियावर गुड न्यूज

0
123
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

अभिनेत्री सागरिका घाटगे या मुळच्या कोल्हापूरच्या कागल मधील घाटगे घराण्यातील असून त्यांचा चाहतावर्ग ही मोठा आहे. या दोघांना मुलगा झाला असून त्या तिघांचा एक खास फोटो पोस्ट करत त्यांनी मुलाचं नावही जाहीर केलं आहे. ‘प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादासह आम्ही आमच्या मुलाचे, फतेहसिंह खान याचे स्वागत करत आहोत.’ ब्लॅक अँड व्हाईट 2 फोटोंसह अशी कॅप्शन लिहीत त्यांनी मुलाचं नाव सर्वांना सांगितलं आहे. एका पोस्टमध्ये सागरिका-झहीर आणि त्याच्या कुशीत झोपलेला लेक दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये नवजात बाळाचं बोट पकडलेला क्लोज अप फोटो आहे. त्यांच्या या पोस्टवर आणि फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत असून अनेकांनी कमेंट सेक्शनमधून त्यांचं अभिनंदन करत लहान बाळालाही आशिर्वाद दिले आहेत.

चक दे इंडिया सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या सागरिका घाटगे आणि भारताचा माजी नामवंत गोलंदाज झहीर खान या दोघांचं लव्ह मॅरेज असून २३ नोव्हेंबर २०१७ साली त्यांनी एकमेकांशी सलग्न केलं. त्याआधी बराच काळ ते एकमेकांना डेट करत होते. आता त्यांच्या घरी पुत्ररत्नाचं आगमन झालं असून अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहे.‘वाहेगुरू’ आणि त्यासोबत हार्ट इमोजी देत, अभिनेता अंगद बेदीने कमेंट केली आहे. ‘खूप खूप शुभेच्छा’ अशी कमेंट क्रिकेटपटून सुरेश रैनाने केली आहे. अभिनेत्री डायना पेंटीनेही सागरिका-झहीरला शुभेच्छा देत गुड न्यूजसाठी त्यांचे अभिनंदन केलं. तर हुमा कुरेशी हिनेही कमेंट बॉक्समध्ये ‘हार्ट इमोजी’ पोस्ट केली आहे.

IPL 2025 मध्ये व्यस्त जहीर खान

जहीर खान सध्य़ा आयपीएल २०२५ मध्ये व्यस्त आहे. या सीझनमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स चा बॉलिंग कोच आहे. आयपीएलमध्ये लखनऊने आत्तापर्यंत ७ सामने खेळले असून त्यापैकी ४ जिंकले तर ३ हरले. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये झहीर खानची टीम ५ व्या स्थानी आहे. आयपीएल २०२५ मधील पुढील सामना १९ एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जाईल. पण, जयपूरमध्ये होणाऱ्या त्या सामन्यापूर्वी झहीर खान त्याच्या पत्नी आणि नवजात बाळासोबत काही वेळ घालवताना दिसण्याची शक्यता आहे.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here