YouTube करणार भारतीय युट्यूबर्स साठी ८५० कोटींची गुंतवणूक

0
389
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

पुढील दोन वर्षांत YouTube भारतीय निर्माते, कलाकार आणि मीडिया कंपन्यांच्या वाढीला गती देण्यासाठी ८५० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करेल.  एका चैतन्यशील नवीन भारतासाठी असंख्य करिअर आणि व्यवसाय मार्ग तयार करण्याचे हे प्रत्यक्ष परिणाम आहेत” असे  यूट्यूबचे सीईओ नील मोहन यांनी सांगितले. ते मुंबई येथे झालेल्या ‘Powering the Creator Economy in India’ या विषयावरील सत्रात बोलत होते.

भारताला “creator nation” असे संबोधून ते म्हणाले की, गेल्या वर्षी देशातील १०० दशलक्षाहून अधिक चॅनेल्सनी YouTube वर कंटेट अपलोड केला आणि त्यापैकी १५,००० हून अधिक चॅनेल्सचे १० लाखांहून अधिक सदस्य आहेत.
“काही महिन्यांपूर्वी ११,००० चॅनेल्सपेक्षा हे जास्त आहे. आणि YouTube ने या निर्मात्यांना केवळ त्यांची आवड जगासोबत शेअर करण्यासच नव्हे तर निष्ठावंत चाहते आणि यशस्वी व्यवसाय देखील निर्माण करण्यास सक्षम केले आहे,” असे मोहन म्हणाले.

“गेल्या वर्षी भारतात तयार केलेल्या कंटेंटमुळे देशाबाहेरील प्रेक्षकांचा ४५ अब्ज तासांचा पाहण्याचा वेळ वाढला. तसेच गेल्या तीन वर्षांतच आम्ही संपूर्ण भारतातील निर्माते, कलाकार आणि मीडिया कंपन्यांना २१,००० कोटींपेक्षा जास्त पैसे दिले आहेत,” असे ते म्हणाले.

मोहन म्हणाले की, भारतीय निर्माते भारताचे वैशिष्ट्य म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांसोबत इतिहास, संस्कृती आणि आवड शेअर करण्याची क्षमता यांचे उदाहरण देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत जगभरातील निर्मात्यांसाठी एक दीपस्तंभ बनला आहे, हे त्यांच्या स्वतःच्या उल्लेखनीय डिजिटल उपस्थितीतून स्पष्ट होते, असे नील मोहन म्हणाले. युट्यूबच्या सीईओंनी नमूद केले की, “युट्यूबवर २५ दशलक्षांहून अधिक सबस्क्राइबर्ससह पंतप्रधानांचे जगातील कोणत्याही सरकार प्रमुखापेक्षा सर्वात जास्त युट्यूब फॉलोअर्स आहेत”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या प्रकारच्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे वेव्हज २०२५ चे उद्घाटन केले.

हे ही वाचा- 👇

यंदाही बारावीत मुलींची बाजी : पहिल्यांदाच महाराष्ट्र बोर्डाचा निकाल लवकर

 

महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांसाठी आहेत विविध शिष्यवृत्ती व अनुदान योजना


Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here