कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूरच्या नूतन पोलीस अधीक्षक पदी योगेश कुमार गुप्ता यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश कुमार गुप्ता हे आयपीएस अधिकारी आहेत. कोल्हापूरचे पूर्व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे शहरात पोलीस उपयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाने आज राज्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली ठाणे शहरात पोलीस उपयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी योगेश कुमार गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागात कार्यरत होते. नांदेड मध्ये येण्या अगोदर त्यांनी लोहमार्ग पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम पहिले आहे.
योगेश कुमार गुप्ता हे १९९३ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या प्रकरणांमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव आहे.