कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पावसाने चार दिवसापासून उसंत घेतली असतानाच आज सकाळपासून कोल्हापुरात परत पाऊस सुरु झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्टमहिन्यात पावसाचा जोर तितकासा असणार नाही. कोल्हापुरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. निरभ्र आकाशाचे आज दर्शन झाले नाही. रिमझिम पाऊस पडत असून त्यातच शेतीची मशागत सुरु आहे. शहरी भागात सकाळी सकाळी पावसाने हजेरी लावल्याने कामानिनिमित्त बाहेर पडणारे तयारीनिशीच बाहेर पडले. हवामान खात्याने शहरासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, याचा अर्थ हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
मे महिन्यापासून सुरु झालेल्या पावसाने गेल्या आठवड्यात उसंत घेतली. या दोन महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे आज पर्यत कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे व बंधारे भरली आहेत. खरतर कोल्हापूर, सांगलीतील नागरीकांना सध्याचे दिवस धोकादायक असतात. मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने हा धोका टळल्याचे समाधान नागरिकांच्यात आहे.
आज कोल्हापूरात सकाळी जरी पाऊस झाला. हवामान खात्याने शहरासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये सरासरीइतका किंवा जास्त पाऊस पडू शकतो.