spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयहवामान बदलाच्या परिणामांची वेळोवेळी जाणिव करुन देणारे शास्त्रज्ञ

हवामान बदलाच्या परिणामांची वेळोवेळी जाणिव करुन देणारे शास्त्रज्ञ

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

जगभरातील हवामान तज्ज्ञांनी वर्षानुवर्षे दिलेल्या इशाऱ्यांकडे आज जग गांभीर्याने पाहू लागले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे वेगाने बदलणाऱ्या हवामानाचा मागोवा घेत, अनेक शास्त्रज्ञांनी वेळेवर दिलेली चेतावणी आता वास्तवात उतरतेय. त्यांच्या अभ्यासांनी आणि संशोधनाने आपण कोणत्या संकटाच्या उंबरठ्यावर आहोत, हे वेळेत अधोरेखित केलं. आजच्या या विशेष बातमीत, आपण अशा जागतिक शास्त्रज्ञांची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी मानव निर्मित हवामान बदलाची वेळेवर जाणीव करून दिली आणि जगाला बदलासाठी दिशा दाखवली.

 डॉ. जेम्स हॅन्सन (अमेरिका ) –

नासाचे माजी हवामानशास्त्रज्ञ व Goddard Institute for Space Studies चे संचालक. यांनी इ.स. १९८८ मध्ये अमेरिकेच्या काँग्रेसपुढे साक्ष देतांना त्यांनी सांगितले की, मानव कृतीमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच हवामान बदलासंबंधी सरकारी पातळीवर गांभीर्याने चर्चा सुरू झाली. म्हणून त्यांना “ग्लोबल वॉर्मिंगचे जनक” म्हणून ओळखले जातात.

स्वांते अ‍ॅरेनियस ( स्वीडन, 1896 ) –

नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी १८९६ मध्ये त्यांनी गणिती पद्धतीने दाखवले की, कोळशासारखी जीवाश्म इंधने जाळल्यास पृथ्वीचे तापमान वाढते. त्यांनी सर्वप्रथम ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’ चे वैज्ञानिक विश्लेषण दिले.

रॉजर रेव्हेल (अमेरिका ) –

समुद्रविज्ञानतज्ज्ञ आणि हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक होते. १९५० च्या दशकात त्यांनी दाखवले की कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये साठत आहे. त्यांनी हवामानशास्त्रातील अनेक मूलभूत सिद्धांतांची पायाभरणी केली. माजी अमेरिकन उपराष्ट्रपती अल गोर यांचे ते मार्गदर्शक होते.

चार्ल्स डेव्हिड किलिंग (अमेरिका) –

हवामान शास्त्रज्ञ ज्यांनी ‘Keeling Curve’ विकसित केली. तसेच त्यांच्या अचूक मापनांनी दरवर्षी CO₂ ची वाढ स्पष्ट केली आणि ती मानवी कृतीशी जोडली.

डॉ. मायकेल ई. मॅन (अमेरिका) –

 ‘हॉकी स्टिक ग्राफ’ प्रसिद्ध करणारे हवामान तज्ज्ञ होते. विसाव्या शतकात झपाट्याने वाढणारे तापमान दर्शवून, हवामान नाकारणाऱ्यांविरोधात विज्ञानाच्या बाजूने आवाज उठवला.

भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान – 

डॉ. आर. के. पचौरी : आंतरराष्ट्रीय हवामान बदल पॅनल (IPCC) चे माजी अध्यक्ष. 2007 मध्ये IPCC आणि अल गोर यांना संयुक्तपणे नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

भारतामधील योगदान : IMD (भारतीय हवामान खाते), TERI, IITs व ISRO यांसारख्या संस्था गेल्या अनेक दशकांपासून हवामान बदलावर संशोधन करत आहेत आणि धोरण निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण आधार देत आहेत.

या शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा आज जास्तच महत्त्वाचा ठरतो आहे. जगभरातील सरकारे, उद्योग आणि सामान्य माणसांनी या संकटाला गांभीर्याने घेतले नाही, तर भविष्यातील पिढ्यांना जबर किंमत मोजावी लागेल.

———————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments