प्रसरमध्यम प्रतिनिधि :
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाबरोबर शहरातील काही महत्वपुर्ण विषय़, विविध शिष्टमंडळांच्या आणि समाजाच्या प्रश्नांवर बैठक पार पडली. या बैठकीला आमदार जयंत आसगावकर यांच्यासह उपस्थित राहिलो. महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मजुलक्ष्मी यावेळी उपस्थितीत होत्या.
या बैठकीत शहरातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये फेरवाले संघटना, दुकानदार आणि गाळाधारकांचे प्रश्न, वारसाहक्क नियुक्ती, पाणीपुरवठा व्यवस्था, नागरी सुविधा रस्ते कामे, आरोग्य व स्वच्छता, तसेच विविध समाज आणि सामाजिक संस्थांचे प्रश्न समजावून घेण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर सर्व समस्या प्रभावीपणे मांडून त्या त्वरित सोडवाव्यात, अशा सुचना केल्या.
यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, फेरीवाले आणि दुकानगाळे धारक संघटनांचे शिष्टमंडळ, विविध समाजाचे प्रतिनिधी, कोल्हापूर महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.






