Google search engine

प्रसारमाध्यम डेस्क :

थंडीत पपई खाणे पचनासाठी उत्तम आहे.कारण त्यात असलेले पॅपेन (Papain) एन्झाइम प्रोटीन पचायला मदत करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते (व्हिटॅमिन C मुळे), आणि शरीराला ऊर्जा देते, ज्यामुळे थंडीच्या दिवसात ऊर्जा मिळते व बद्धकोष्ठता, सूज यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो,पपई ‘वॉर्म नेचर’ असलेले फळ मानले जाते. त्यामुळे थंडीत ते शरीराची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढवून शरीराला उब देण्यास मदत करते. , पण प्रमाणात खाणे आवश्यक आहे.पपई मधील व्हिटामिन ‘A’ आणि अँटिऑक्सिडंट त्वचेला मॉइश्चराइझ करते. 

थंडीत पपई खाण्याचे फायदे:
पचनास मदत: पपईमध्ये असलेले ‘पॅपेन’ नावाचे एन्झाइम प्रथिने तोडण्यास मदत करते, ज्यामुळे अन्न पचवणे सोपे होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात.

वजन नियंत्रणास मदत : पपई कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे थंडीत वाढणारी भूक नियंत्रित ठेवण्यास      मदत करते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते: व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि बीटा-कॅरोटीन (Beta-carotene) भरपूर असल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि संसर्गाशी लढण्यास मदत मिळते.

शरीराला उष्णता: आयुर्वेदानुसार पपईचा स्वभाव उष्ण असल्यामुळे थंडीत खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि थंडीचा सामना करण्यास मदत होते.

सूज कमी करते: यातील एन्झाइम्समुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर: पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

चांगली झोप: जड जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पपईचा समावेश केल्यास पचनक्रिया सुधारते. त्यातील नैसर्गिक ट्रिप्टोफॅनमुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.

 

पण कुठली ही गोष्ट अति प्रमाणत खाणे त्रासदायकच  ठरू शकते. त्यामुळे पपई खाताना थोड जपूनच खावे नाही तर हे परिणाम भोगावे लागतात.

पपईत फायबर जास्त असल्याने खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर पोट बिघडू शकते.
अतिसार, पोटात गुडगुड, गॅस होऊ शकतो.

काही लोकांचा पचनस्वभाव थंड असतो. अशांना पपई कच्ची किंवा जास्त प्रमाणात खाल्यास
अपचन किंवा पोटात कळा येऊ शकतात.

डायबेटीस असलेल्या लोकांनी काळजी पपई गोड असते. जरी GI कमी असला तरी जास्त प्रमाणात खाल्यास
ब्लड शुगर वाढू शकतो,मधुमेही व्यक्तींनी प्रमाण मर्यादेत खावे.

अॅलर्जीचा त्रास असणाऱ्यांनी सावध काही लोकांना पपईतील लेटेक्स पदार्थामुळे
अॅलर्जी (खाज, पुरळ) होऊ शकते.

एकदम थंड पपई खाणे टाळा. फ्रिजमध्ये ठेवलेली पपई लगेच खाल्ल्यास थंडीत
सर्दी-खोकला वाढू शकतो. पपई रूम टेंपरेचरला आणून खावी.

सर्वात महत्वाचे गर्भवती महिलांसाठी कच्ची पपई टाळावी कच्च्या पपईत असलेला लेटेक्स गर्भाशय आकुंचनास कारणीभूत होऊ शकतो. कच्ची पपई पूर्णतः टाळावी, पण पिकलेली पपई मर्यादेत सुरक्षित असते.पण रिस्क ण घेतलेलीच बरी शक्यतो खाऊच नये.

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here