राधानगरी प्रतिनधी : प्रसारमाध्यम न्यूज
आरोग्य सेवेत काम करणाऱ्या आपल्या सर्वांची मेहनत, समर्पण आणि जागरूकता ही आपली लोकसंख्या रोगांपासून सुरक्षित ठेवण्याचं मुख्य साधन आहे. साथीच्या काळात आपली भूमिका अधिकच महत्त्वाची आहे कारण रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती हीच आपली खरी शक्ती असल्याचं प्रतिपादन राधानगरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेट्ये यांनी केलं. ते गुडाळ इथं बोलत होते.
राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथे राधानगरी पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीनने हिवताप प्रतिरोध मास शुभारंभ आणि डेंग्यू मलेरिया जनजागृतीसाठी आरोग्य विभागाचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यिका गीतांजली चौगले,कमल तोडकर आणि सुनीता फराकटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेट्ये यांनी आपली मेहनत, समर्पण आणि जागरूकता ही आपली रोगांपासून सुरक्षित ठेवण्याचं मुख्य साधन आहेत. साथीच्या काळात आपली भूमिका अधिकच महत्त्वाची आहे कारण रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती हीच आपली खरी शक्ती असल्याचं सांगत साथीच्या काळातील आरोग्य सेवेतील कर्तव्ये स्पष्ट केली.
वैद्यकीय अधिक्षक मिलिंद कदम यांनी विभागीय आयुक्तांनी आयोजित केलेल्या शंभर दिवसीय कार्यक्रमांमध्ये राधानगरी तालुका आरोग्य विभाग महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरलं आहे याचं श्रेय तालुका आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्व घटकांचं असल्याचं त्यांनी सांगितलं,आरोग्य सेवक रवी परीट, आरोग्य सहायक एस आर पाटील,विक्रम वागरे यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई,गजानन मोहिते,आर.एस.पाटील,रवी परीट,जी आय पाटील,आर एस पाटील, जिल्हा नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा एम.एम.पाटील, एस. आर. पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.







