कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे. आजच्या बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये संविधानिक मूल्यांचा वापर कमी होत चालला आहे. अशा स्थितीत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक चौकटीचा योग्य वापर होणे अत्यावश्यक असून वंचित आणि बहुजानांचे प्रश्न सोडविण्यासाठी या पदाचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नव नियुक्त महानगर जिल्हाध्यक्ष अरुण सोनवणे यांनी केले.
कोल्हापूर सर्किट हाऊस येथे झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार समारंभात कृतज्ञता व्यक्त करताना सोनावणे म्हणाले, ” पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी मनापासून पार पाडणार आहे. शहरातील व ग्रामीण भागातील वंचित घटकांपर्यंत संविधानिक हक्क पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ असल्याने त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोचण्याच्या व पक्षाची ध्येय, धोरणे पोचवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.”
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमोद कदम (जिल्हाध्यक्ष), शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, जिल्हा महासचिव अरुण जमणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष जे.के. कांबळे, पन्हाळा तालुकाध्यक्ष दामाजी जाधव, युवा शहराध्यक्ष अमित नागटीळे, तसेच निलेश बनसोडे व नितीन कांबळे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी सोनवणे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
————————————————————————–



