spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअर्थ - उद्योगप्रवासी वाहने, दुचाकी स्वस्त होणार ?

प्रवासी वाहने, दुचाकी स्वस्त होणार ?

केंद्र सरकारचा जीएसटी दरांमध्ये मोठा बदल करण्याचा प्रस्ताव

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे अनेक वाहनं व त्यांचे पार्ट्स स्वस्त होऊ शकतात, तर काही वाहनांवर ग्राहकांना अधिक कर मोजावा लागू शकतो. या संदर्भातील अंतिम निर्णय ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

कोणती वाहनं स्वस्त होणार

रुग्णवाहिका व १० किंवा त्याहून अधिक प्रवासी वाहून नेणारी मोटार वाहने : जीएसटी २८ टक्के वरून १८ टक्के. पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजी वर चालणारी छोटी कार (इंजिन क्षमता १२०० सीसी पर्यंत व लांबी ४०००मिमी पर्यंत) : जीएसटी २८ टक्क्यावरून १८ टक्के. डिझेलवर चालणारी छोटी कार (इंजिन क्षमता १५०० सीसी  पर्यंत व लांबी ४००० मिमी पर्यंत) : जीएसटी २८ टक्केवरून १८ टक्के. तीन चाकी वाहने : जीएसटी २८ टक्के वरून १८ टक्के. ३५० सीसीपर्यंत इंजिन असलेल्या मोटारसायकली : जीएसटी २८ टक्के वरून १८ टक्के. मोटार वाहनांचे पार्ट्स, सीट व अ‍ॅक्सेसरीज : जीएसटी २८ टक्वके वरून १८ टक्के.

 कोणती वाहनं महाग होणार :

स्टेशन वॅगन, रेसिंग कार व मोठी मोटार वाहने (१२०० सीसी पेक्षा जास्त इंजिन व ४००० एमएम पेक्षा जास्त लांबी) : जीएसटी २८ टक्के वरून ४० टक्के. खाजगी वापरासाठी विमाने, हेलिकॉप्टर व विमानं : जीएसटी २८ टक्के वरून ४० टक्के. नौका व इतर जहाजं : जीएसटी २८ टक्के वरून ४० टक्के.

या बदलांमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी परवडणाऱ्या वाहनांवर मोठा दिलासा मिळू शकतो. मोटारसायकली, छोटी कार व तीनचाकी वाहने स्वस्त होण्याची शक्यता असल्याने विक्रीतही वाढ होईल. मात्र आलिशान व खाजगी वापरासाठी असलेल्या वाहनांवर अधिक कर आकारला जाणार असल्याने श्रीमंत वर्गावर अतिरिक्त भार पडणार आहे.

———————————————————————————————–

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments