कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
रिझर्व्ह बँकेची एमपीसी बैठक ४ जून ते ६ जून दरम्यान होणार आहे. गुंतवणूकदार, बँका आणि सामान्य जनतेच्या नजरा या बैठकीतील निर्णयाकडे खिळल्या आहेत. गेल्या सलग दोन वेळा आरबीआयने व्याजदरात कपात केली, ज्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज, कॉर्पोरेट कर्जे यांसारखी कर्जे पूर्वीपेक्षा स्वस्त झाली आहेत.
आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात करण्याची कर्जदारांना अपेक्षा आहे. असे झाल्यास कर्जे स्वस्त होतील, ज्यामुळे सामान्य माणसाच्या खिशात आणखी पैसा खिळेल. आरबीआने रेपो दर कमी केला तर बँकांना स्वस्त कर्ज मिळते, ज्याचा फायदा सर्वसामान्यांना स्वस्त कर्जे आणि कमी ईएमआयच्या स्वरूपात मिळेल.
सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याची शक्यता आहे. महागाई दर सध्या लक्ष्य सरासरी ४ टक्के पेक्षा कमी असल्याने ही अपेक्षा व्यक्त केली जात असून अजूनही अमेरिकेच्या टॅरिफशी संबंधित पावलांमुळे जागतिक अनिश्चितता कायम आहे. याआधी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये आरबीआयने रेपो दरात ०.२५ – ०.२५ टक्के कपात केली आणि ६ टक्क्यांवर आणला.



