प्रसारमाध्यम डेस्क
आपल्या समाजात विवाह झाल्यानंतर महिलांना जोडवी घालण्याची परंपरा कायम आहे. हे सौभाग्याचं लक्षण मानले जाते. विवाहानंतर गळ्यात मंगळसूत्र, दोन्ही पायांच्या बोटात जोडवी, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, पायात पैंजण, कपाळावर कुंकू लावण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. ही आभूषणे परिधान केल्यानंतर महिलांच्या सौंदर्यांसोबत समाजातील तिचे महत्त्व वाढते. तसेच महिलांच्या आरोग्यासाठीही चांगले असते. महिला लग्नानंतर पायात जोडवी घालण्या मागे काही पारंपरिक कारणे आहेत. ती जाणून घेवूयात...
पारंपरिक महत्त्व
जोडवी घालणे हे विवाहित स्त्रीचे “सौभाग्य” आणि “संस्कार” यांचे द्योतक मानले जाते. लग्नानंतर जोडवी घालणाऱ्या महिलांना “सौभाग्यवती” म्हणून संबोधले जाते. या परंपरेला धार्मिक व सांस्कृतिक अधिष्ठान असल्यामुळे आजही ग्रामीण तसेच शहरी भागात जोडवी परिधान करण्याची प्रथा कायम आहे.
शरीरात थंडावा निर्माण होतो
जोडवी प्रामुख्याने चांदीची असते. शास्त्रानुसार सोने परिधान केल्याने शरीरात उष्णता वाढते, तर चांदी परिधान केल्याने थंडावा निर्माण होतो.
महिला जेव्हा पायात चांदीची जोडवी घालतात तेव्हा तिच्या स्पर्शामुळे शरीराला आवश्यक थंडावा मिळतो. विशेषतः उन्हाळ्यात किंवा गरम प्रकृतीच्या स्त्रियांमध्ये हा थंडावा संतुलन राखण्यासाठी उपयुक्त ठरतो.
शरीरासाठी फायदेशीर
जोडवी केवळ अलंकार नाही, तर ती महिलांच्या आरोग्याशी निगडित आहे. पायात जोडवी घातल्याने पायाच्या बोटांमध्ये असलेल्या एका महत्त्वाच्या रक्तवाहिनीवर हलका दाब येतो.
हा दाब महिलांच्या गर्भाशयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्याला गती देतो. त्यामुळे प्रजनन क्षमता सुधारते, मासिक पाळी नियमित राहते आणि महिलांचे आरोग्य चांगले राहते.
हृदयरोगाचा धोका टळतो
तज्ज्ञांच्या मते, जोडवी घातल्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा संतुलित होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
जोडवी परिधान करणाऱ्या महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका (हार्ट अॅटॅक) येण्याची शक्यता तुलनेने कमी असल्याचे संशोधनांमधून स्पष्ट झाले आहे.
सांस्कृतिक व वैज्ञानिक संगम
आजच्या विज्ञानाच्या दृष्टीनेही जोडवीचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पूर्वी केवळ सौभाग्याचे लक्षण मानली जाणारी जोडवी ही प्रत्यक्षात महिलांच्या आरोग्यासाठी हितावह आहे, हे स्पष्ट होते. म्हणूनच आजही विवाहित स्त्रिया ही परंपरा अभिमानाने जपतात.
विवाहानंतर स्त्रीने जोडवी घालणे म्हणजे ती “संपूर्ण गृहिणी” व “संस्कारांची पाळेमुळे घट्ट धरलेली” असल्याचे प्रतिक मानले जाते. आधुनिकतेच्या वाऱ्यात अनेक परंपरा बदलत असल्या तरी जोडवीचे महत्त्व मात्र आजही टिकून आहे.
———————————————————————————————–