नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. दोन महिन्यापासून हे पद रिक्त आहे. आज संसद भवनातसकाळी दहा वाजल्यापासून उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. या पदासाठी एनडीए आघाडीचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उमेदवार आहेत. तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी आहेत. राधाकृष्णन व रेड्डी यांच्यात ही निवडणूक चुरशीची होत आहे. सायंकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपेल. आजच मतमोजणी होऊन सायंकाळपर्यंत नवीन उपराष्ट्रपती मिळेल. ही निवडणूक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमध्ये एकल हस्तांतरणीय मतदान प्रणालीद्वारे घेतली जाते.
उपराष्ट्रपतींचे वेतन
उपराष्ट्रपती पदासाठी स्वतंत्र वेतनाची तरतूद नाही. राज्यसभा अध्यक्ष म्हणून त्यांना दरमहा 4 लाख रुपये वेतन दिले जाते. तसेच त्यांना निवास, वैद्यकीय सुविधा, प्रवास (विमान, रेल्वे), कार्यालयीन खर्च, सुरक्षा, टेलिफोन सेवा आणि पेन्शन यासारख्या सुविधा दिल्या जातात. पेन्शनची पातळी मागील पगाराच्या ५० टक्के आहे.
कार्यकाळ
उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ हा ५ वर्षांचा असतो आणि पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता असते. जर कार्यकाळ संपल्यानंतरही नवीन पदाधिकारी नियुक्त झाला नाही तर ते काम करत राहतात.
———————————————————————————————-



