जगप्रसिद्ध पुस्तक ऑटो बायोग्राफी ऑफ योगी लिहिणारे व पाश्चात्य देशात ही मोठा शिष्य वर्ग असणारे श्री परमहंस योगानंद यांचे गुरु श्री युक्तेश्वर गिरी यांचा आज पुण्य दिन. ते ९ मार्च १९३६ रोजी या भौतिक शरीरातून विलीन झाले, पण आजही त्यांची शिकवण आणि आध्यात्मिक वारसा जगभरातील साधकांना मार्गदर्शन करत आहे. त्यांचे वैशिष्ट म्हणजे त्यांनी पौरवत्या आणि पाश्चिमात्य संस्कृती ची ध्यान आणि क्रियायोग द्वारे सांगड घातली. तसेच त्यांना हिंदू धर्मासोबतच ख्रिश्चन धर्मातील धार्मिक ग्रंथांचे ही बरेच ज्ञान होते त्यांच्या आदेशावरूनच परमहंस योगानंद अमेरिकेत जाऊन ध्यान आणि क्रियायोगाच्या प्रसारासाठी गेले आणि तेथे त्यांनी ‘सेल्फ रियलायजेशन’ या संस्थेची स्थापना केली.
श्री युक्तेश्वर गिरी हे एक थोर योगी, तत्वज्ञ आणि आध्यात्मिक गुरु होते. त्यांचा जन्म १० मे १८५५ रोजी सेरमपूर, पश्चिम बंगाल येथे झाला. त्यांचे जन्म नाव प्रीयनाथ करार होते. ते बालपणापासूनच तेजस्वी, बुद्धिमान आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांनी तत्वज्ञान , वेदांत, खगोलशास्त्र, ज्योतिष, आणि बायबलचा सखोल अभ्यास केला. त्यांची ओळख एका महान गुरु म्हणून झाली जेव्हा त्यांनी “The Holy Science” हे ग्रंथ लिहिले. या ग्रंथामध्ये त्यांनी वेदांत आणि बायबल यातील तत्त्वज्ञानाचे सुसंगत साम्य उलगडले.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत युक्तेश्वर लिहितात या पुस्तकाचा उद्देश हे दाखवून देणे आहे की ‘सर्व धर्मांमध्ये मुळात एकता आहे; विविध धर्ममतांनी सांगितलेल्या सत्यांमध्ये कोणताही फरक नाही. “ज्या पद्धतीने जगाची उत्क्रांती झालेली आहे ती पद्धत एकच आहे आणि सर्व धर्मग्रंथांनी एकाच ध्येयाची कबुली दिलेली आहे.”
श्री युक्तेश्वर गिरी हे श्री लाहिरी महाशय यांचे शिष्य होते, आणि नंतर ते परमहंस योगानंद यांचे गुरु झाले. परमहंस योगानंदांनी आपल्या “Autobiography of a Yogi” (योगींची आत्मकथा) या प्रसिद्ध ग्रंथात युक्तेश्वर गिरी यांचा उल्लेख फारच भक्तिभावाने केला आहे.

श्री युक्तेश्वर हे ‘गिरी’ परंपरेतील सन्यासी होते. त्यांनी योग साधना, ध्यान, आणि क्रिया योग यांचा प्रचार केला. त्यांनी जगाला धर्म, विज्ञान आणि आध्यात्मिकतेचे एकत्रित रूप दाखवले. त्यांची शिकवण अत्यंत सुलभ, स्पष्ट आणि सत्यनिष्ठ होती.

श्री युक्तेश्वर गिरी यांचा महासमधीचा क्षण.
अध्यात्मात ‘गिरी’, ‘परमहंस’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या पदव्या आध्यात्मिक प्रगती दर्शवतात.
‘गिरी’ म्हणजे पर्वतासारखे स्थिर आणि दृढ आध्यात्मिक व्यक्तिमत्व , ‘परमहंस’ म्हणजे सर्वोच्च आध्यात्मिक स्थिती, तर ‘स्वामी’ म्हणजे आत्म-नियंत्रित आणि ज्ञानी व्यक्ती, जी इतरांना मार्गदर्शन करते.
गिरी:
‘गिरी’ ही पदवी साधकाला एका विशिष्ट आध्यात्मिक मार्गावर दृढपणे आणि स्थिरपणे राहण्यासाठी ओळखली जाते.
परमहंस:
‘परमहंस’ ही पदवी सर्वोच्च आध्यात्मिक स्थिती दर्शवते, जी ज्ञानाने परिपूर्ण आणि आत्म-साक्षात्काराने युक्त असते.
स्वामी:
‘स्वामी’ ही पदवी आत्म-नियंत्रित आणि ज्ञानी व्यक्तीसाठी वापरली जाते, जी इतरांना योग्य मार्ग दाखवते आणि त्यांना आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करते. यांची काही उदाहरणे खालील प्रमाणे
स्वामी विवेकानंद: हे एक प्रसिद्ध उदाहरण आहेत, ज्यांनी जगाला भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचे महत्त्व सांगितले.
परमहंस योगानंद: हे एक प्रसिद्ध योग शिक्षक आहेत, ज्यांनी पाश्चात्त्य देशांमध्ये योग आणि ध्यान यांसारख्या आध्यात्मिक पद्धती लोकप्रिय केल्या.
श्री रामकृष्ण परमहंस: हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते, ज्यांनी त्यांना आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन केले.
या पदव्या आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक आहेत, जे साधकाला त्याच्या ध्येयाकडे नेण्यास मदत करतात.
या पदव्या इतरांना प्रेरणा देतात आणि त्यांना आध्यात्मिक मार्गावर चालण्यास मदत करतात.
या पदव्या आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक आहेत, जे जगाला शांती आणि समृद्धीकडे घेऊन जाते.