कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
उद्या ५ जून पर्यावरण दिन. यानिमित्त पर्यावरण विषयी लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.
आता पावसाळाही सुरु होतोय. बी रुजण्यास आणि झाडांची रोपं वाढण्यास हे हवामान अतिशय अनुकूल असते. म्हणूनच फार मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. कोणती रोपं कोणत्या ठिकाणी लावायची ते या भागात पाहू.
देशी वृक्ष जागृती अभियान..
दलदल आणि पाणथळ जमिनीसाठी योग्य देशी वृक्ष : बाभूळ, काटेसावर, शिसव, अर्जुन, जांभूळ, भेडस, भोकर, वायवर्णा, वाळूज, सोनखैर, सीताअशोक, तिवर, सुकाणू, समुद्रफळ, निवर, इ.
कमी पावसाच्या ठिकाणी, उष्ण-कोरड्या हवामानास योग्य देशी वृक्ष : कडूलिंब, पळस, शिसव, करंज, शिरीष, बहावा, बकान लिंब, वड, पिंपळ, नांदूक, बेल, कवठ, हिंगणबेट, बाभूळ, शमी, धावडा, अंकोळ, पाचूंदा, सालई, कांडोळ, बूचपांगारा, हिवर, पांढरा खैर, अंजनी, तेंदू, मोई, दहिवान, गणेर, भोकर, इ.
खारवट जमिनीसाठी योग्य देशी वृक्ष : कडूलिंब, मोहा, पळस, आवळा, गुलभेंडी, अर्जुन, शिरिष, करंज, उंडी, तिवर, समुद्रफळ, सुकाणू, निवर, इ.
पक्षांना आकर्षित करणारे देशी वृक्ष : काटेसावर, गणेर, पळस, पांगारा, टोकफळ, मोहा, वड, कौसी, रानपांगारा, बूचपांगारा, अटक, इ.
सुंदर, आकर्षक फुले देणारे देशी वृक्ष : ताम्हण (जारूळ), बहावा, तिवर, करमळ, वायवर्णा, नागकेशर, गणेर (सोनसावर), मुचकुंद, काटेसावर, पळस, पांगारा, कदंब, सीताअशोक, सोनचाफा, सुरंगी, कांचन, कंचनार, शिरीष, कुंती, पारिजातक, तिवस, समुद्रफळ, गुलभेंडी, टोकफळ, बुचपांगारा, वारस, मोहा, बकूळ, सुकाणू, शिवण, बेलपटा, कौसी, मोठा तरवड, हादगा*.
आकर्षक पर्णसंभार असणारे देशी वृक्ष : कडूलिंब, करंज, शिसव, शिसम, पुत्रजीवी, सातवीण, जांभूळ, उंडी, शिरिष, जंगली बदाम, महारूख, टून (महानीम), कुंती, बकान लिंब, निंबारा, रिठा, कोसिंब, आपटा, बिवळा, वावळ, चिंच, बेहडा, अर्जुन, अंकोळ, हळदू, कळम, बकूळ, मोहा, कदंब, सुरंगी, भोकर, गोंदणी, वड, पिंपळ, उंबर, पिंपर्णी, नांद्रुक, वाळुंज, रत्नगुंज, पायर, इ.
लहान आकार व कमी उंचीचे देशी वृक्ष : कुंती, पारिजात, शेवरी, शिसव, पांढरा कुडा, मेढशिंगी, पाचुंदी, मोठा तरवड,भुईउंबर, कनचंपा, कडीपत्ता, चंदन, ऐरण इ.
सरळसोट वाढणारे आणि फांद्यांचा कमी विस्तार असणारे देशी वृक्ष : बकाण लिंब, नारळ, सुपारी, शिंदी, टेटू, सागवान, टोकफळ, हादगा इ.
मंदिर परिसरात लावण्याजोगी योग्य देशी वृक्ष : वड, उंबर, पिंपळ, बेल, कदंब, कळम, देवजांभूळ, शमी, आपटा, कडुलिंब, अजानवृक्ष,सीताआशोक,रूद्राक्ष, पारिजातक इ.
शेताच्या बांधावर लावण्यासाठी योग्य देशी वृक्ष : शेवरी, बकान लिंब, टेटू, टोकफळ, शेवगा, निंबारा, हादगा
मध्यम आकार व मध्यम उंचीचे देशी वृक्ष : करंज, शिवण, आपटा, कांचन, कंचनार, रिठा, भोकर, बेल, बहावा, सीताअशोक, ताम्हण (जारूळ), बहावा (अमलतास), तिवर, पळस, पांगारा, करमळ, नागकेशर, उंडी, आंबा, गुलभेंडी, गणेर (सोनसावर), कवठ, वारस, शिसम, चारोळी, बिब्बा, मोहा, टेमरू, रत्नगुंज, आवळा, गोंदणी, धावडा, आंबाडा, सुकाणु, कोकम, शमी, खैर, बुचपांगारा, बाभूळ, समुद्रफळ, धामण, कौसी, रूद्राक्ष, बेलपटा, निंबारा, कळम इ.
आकाराने मोठे व उंच वाढणारे देशी वृक्ष : उंबर, पिंपळ, वड, पिंपर्णी, पायर, नांद्रूक, सातवीण, पुत्रंजीवी, बेहडा, कदंब, शिरीष, बकूळ, अर्जुन, कडूलिंब, वायवर्णा, काटेसावर, मुचकुंद, सोनचाफा, चिंच, सुरंगी, जांभूळ, जंगली बदाम, फणस, अंकोळ, महारूख, रानबिब्बा, भेरली माड, बिवळा, दून (महानीम), हळदू, वाळुंज, कोसिंब, वावळ, अंजनी, इ.
खाण्यायोग्य फळे देणारे देशी वृक्ष : कोकम, बोर, चारोळी, आंबा, बिब्बा, रानआंबा, शेवगा, चिंच, अंजीर, जांभूळ, आवळा, फणस, नारळ, धामण, तांबट, पपनस, महाळुंग, उंबर, रानफणस, इ.
औषधी गुणधर्म असणारे महत्वाचे देशी वृक्ष : वायवर्णा, नागकेशर, बेल, काटेसावर, कवठ, कडूलिंब, पळस, बिवळा, बहावा, सीताअशोक, बेहडा, अर्जुन, जांभूळ, कदंब, मोहा, सातवीण, टेटू, शिवण, उंबर, चंदन, रक्तचंदन, रूद्राक्ष, काजरा, आवळा, बकूळ, तिरफळ, हिरडा, इ.
साभार : झाड लावताना … वृक्षारोपणासाठी मार्गदर्शक पुस्तिका
लेखक : डॉ. मधुकर बाचूळकर व डॉ. मकरंद ऐतवडे
—————————————————————————————