आय. ए. एस. म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा, थोडक्यात सांगावयाचे झाले तर सरकारी कामकाजाची एक मजबूत पोलादी चौकट म्हणावयास हरकत नाही. सर्वसाधारणपणे आपण आयकर अधिकारी, राजदूत व परराष्ट्र सचिव, निवडणूक अधिकारी, कस्टम, एक्साईज, इनकमटॅक्स, जिल्हा कलेक्टर, केंद्र सरकारच्या विविध खात्यातील सल्लागार, ह्या सर्व अधिकारपदी यश मिळविण्यासाठी किंवा हे योग कुंडलीमध्ये पाहत असताना तुमच्या कुंडलीमध्ये सर्वप्रथम अधिकारयोग आहेत की नाहीत हे पाहावे लागेल.
ग्रहांचा विचार केला असता रवी ग्रह जास्त महत्वाचा असतो आणि रवी, मेष, सिंह न वृश्चिक राशीचा असावा. म्हणजे स्वराशीचा मंगळाच्या राशीमध्ये असावा व तो लग्न, षष्ठ, भाग्य किंवा दशम स्थानी असावा. व त्याचबरोबर पंचमेश म्हणजे पंचमस्थानाचा स्वामी त्रीकोनामध्ये किंवा पहिल्या, सातव्या, दहाव्या स्थानी असावा. व तो शुभ ग्रहांच्या दृष्टीमध्ये असावा. रवी-शनी, चंद्र-शनी, शनी-हर्षल यांचा प्रतियोग कुंडलीमध्ये कोठेही नसावा. शनी, लग्नी, तृतीय पंचम, भाग्य व एकादशस्थानी असावा. कुंडलीमध्ये चंद्र शनीच्या पुढील स्थानामध्ये किंवा मागील स्थाना मध्ये असू नये. तरच या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळते.
आय. ए. एस. होऊन जे लोक न्यायाखात्यामध्ये घेतले जातात त्यांच्या कुंडलीमध्ये शनी अनुकूल व शुभदृष्टीमध्ये असतो व मंगळ अशुभदृष्टीत असतो. आणि जे लोक रेव्हिन्यू खात्यात म्हणजे कस्टम, सेन्ट्रल एक्साईज, इन्कमटॅक्स त्यांचा मंगळ बलवान असतो व त्यांची चंद्र व लग्न राशी कर्क, सिंह, वृश्चिक असते.
तसे पहिले तर आय. ए. एस. ही परीक्षेत यश मिळविण्यासाठी कुंडलीमध्ये गुरु बलवान असावा लागतो व तो मिथुन कन्या या बुधाच्या राशीमध्ये व मकर या पृथ्वीतत्वाच्या शनीच्या नकारात्मक राशीमध्ये असू नये. मकर राशीमध्ये गुरु नीचेचा ठरतो. पंचमस्थानी शुभयोगामध्ये, शुभग्रहदृष्टीमध्ये गुरु असेल तर असे लोक या क्षेत्रात खूप यशस्वी होतात. गुरु बरोबर शनी मंगळाचे अशुभ योग म्हणजे युती प्रतियुती केंद्र व केंद्रात्री कोण योग असू नयेत. कधी कधी बाराव्या स्थानी असलेला गुरु देखील या योगसाठी शुभ मनाला जातो. त्यामुळे कुंडलीतील बाराव्या स्थानातील गुरु शिक्षणास विरोध करणारे असतात अस समजू नये, तर ते शुभ ही असू शकतात. शनी जर त्याच्या स्वराशी मध्ये म्हणजे मकर व कुंभ आणि त्याची उच्च राशी तुला मध्ये असेल तर तो या योगासाठी कोणत्या न कोणत्या विषया मध्ये शुभ फले देतो गुरू पंचमेश असेल तर म्हणजे पंचमस्थानाचा स्वामी असून पहिल्या, पाचव्या, नव्या म्हणजे भाग्यस्थानी असेल तर या क्षेत्रासाठी अपूर्व यश येऊ शकते.
या क्षेत्रामध्ये खूपच चढाओढ आपल्याला पहावयास मिळते त्यामुळे परीक्षेमध्ये फक्त चांगले मार्क्स मिळून चालत नाहीत तर आपल्याला यश येणार का हे पाहण्यासाठी मंगळ बुधाचे शुभ योग असावे लागतात. मंगळ बुधामध्ये काटकोन योग असावा पण मंगळ बुधामध्ये प्रतियोग असू नये. पण मंगळ बुधमध्ये एक तरी शुभ दृष्टीयोग असावाच लागतो.
– जोतिषविशारद – मानसी पंडित
———————————————————————————————–