पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
वारणा विद्यापीठ अंतर्गत वारणा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अमेरिकेतील व्ही एस के वाय सोल्युशन्स या कंपनीबरोबर एम ओ यु हा कॅम्पस सिलेक्शन संदर्भातील सामंजस्य करार झाला असल्याची माहिती वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एम पिसे आणि व्हि एस के वाय कंपनीचे प्रमुख विकास हवलदार आणि डेव्हिड यांनी दिली.
वारणा विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या श्री तात्यासाहेब कोरे वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत कार्यरत असलेल्या व्ही एस के वाय सोल्युशन या कॉम्प्युटर सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कंपनी बरोबर कॅम्पस सिलेक्शन संदर्भातील महत्त्वाचा सामंजस्याचा करार करण्यात आला असून यामुळे पदवी घेऊन बाहेर पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला देशासह परदेशात सुद्धा शंभर टक्के नोकरीची हमी मिळणार असल्याची माहिती वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एम पिसे आणि व्हि एस के वाय कंपनीचे प्रमुख विकास हवलदार आणि डेव्हिड यांनी दिली.
या करारामुळे वारणा विद्यापीठातून बाहेर पडणारे विद्यार्थी देशात परदेशात वारणेचं नाव आणि वारणेची गुणवत्ता सिद्ध करून दाखवणार आहेत आणि यातूनच विद्यार्थ्यांचे करिअर देखील घडणार आहे. या झालेल्या करारा संदर्भातील अधिक माहिती देताना अमेरिकेतील व्ही एस के वाय सोल्युशन कंपनीचे समन्वयक आणि वारणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 1987 च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी विकास हवालदार म्हणाले की कॉम्प्युटर इंडस्ट्री दिवसाला बदलत चालली असून दिवसागणिक बदलणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश करणे विद्यापीठाला शक्य होत नाही .त्यासाठी अशा कंपनी बेस्ड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीज डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचल्या तरच पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी हा एम ओ यु सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
यावेळी अमेरिकेतील व्ही एस के वाय सोल्युशन कंपनीचे प्रमुख डॉक्टर डेव्हिड यांनीही अमेरिकेतील कॉम्प्युटर इंडस्ट्रीला आवश्यक असणारे मनुष्यबळ वारणेतून निर्माण करू असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक बाबासाहेब बागणे,प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
————————————————————————————————