कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
केंद्रीय निवृत्तवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने सेवानिवृत्त योजनेतर्गत एकीकृत योजना अमलबजावणी नियम अधिसूचित केले. ज्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्याना २० वर्षाच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्तीची मुभा मिळणार आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच एकिकृत पेन्शन योजना (युपीएस) नियमांची अधिसूचना जारी केली आहे, ज्यानुसार राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता २० वर्षांची नियमित सेवा पूर्ण केल्यावर निवृत्तीचा लाभ घेता येईल. या बदलामुळे २५ वर्षांच्या पूर्वीच्या सेवेच्या मर्यादेत घट होऊन, कर्मचाऱ्यांना २० वर्षांनंतर निवृत्तीचा पर्याय निवडता येईल.
राष्ट्रीय पेन्शन योजना अर्थात एनपीएस आणि एकिकृत पेन्शन योजना अर्थात युपीएस स्वीकारणाऱ्यांसाठी व्हीआरएसची मुभा असेल. अश्युअर्ड पेआऊट अर्थात पेन्शनची संपूर्ण रक्कम मात्र २५ वर्षांच्या सेवेची अट पूर्ण करणाऱ्यांनाच मिळणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अखेरच्या १२ महिन्यांच्या सरासरी मासिक वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून ग्राह्य धरली जाईल. तर, २० वर्षांमध्येच निवृत्ती घेतल्यास अर्थात पेन्शन लाभानुसार पात्र सेवा भागिले २५ अशा सूत्रानं पेन्शनची रक्कम निर्धारित केली जाईल. केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुार निवृत्तीच्या तारखेपासून हा नियम लागू असेल.
स्वेच्छानिवृत्तीनंतर पेन्शनची रक्कम अर्थात अश्युअर्ड पेआऊट सुरू होण्याआधीच कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कायद्यानं पत्नी/ पतीला कर्मचाऱ्याच्या मृत्युदिनापासून लाभ दिला जाईल. २० वर्षांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली तरीही इतर सुविधा मात्र कर्मचाऱ्यांसाठी लागू राहतील. यामध्ये पर्सनल क़ॉर्पस, महागाई भत्ता, ग्रच्युइटी, रजेची रक्कम आणि तत्सम लाभांचाही समावेश आहे.
—————————————————————————————-






