कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कुलगुरूंनी अचानक परीक्षा केंद्रास भेट दिली. त्यावेळी त्यांना ३७ कॉपी बहाद्दर विद्यार्थी आढळले. ही घटना आहे, बीडमधील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी अचानक परीक्षा केंद्राना भेट दिली. कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परफॉरमन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरू फुलारी यांनी परीक्षा संचालकांना दिले आहेत. बलभीम महाविद्यालय, आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय आणि केएसके महाविद्यालय या तीन महाविद्यालयातील परीक्षा कक्षांना फुलारी यांनी अचानक भेट दिली. या ठिकाणी त्यांनी कारवाई केली.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा २९ एप्रिल पासून सुरु झाल्या आहेत. बीड शहरातील बलभीम – १५, केएसके – १५ आणि आदित्य – ७ इतके विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. यावेळी भरारी पथकातील अधिकारीही उपस्थित होते. विशेष म्हणजे या भेटीवेळी कुल्गुरुना संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य भेटू शकलेच नाहीत.