पन्हाळा : प्रतिनिधी
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली ४७ वर्षापासून सुरू असलेली वर्षा व्याख्यानमाला यावर्षी शुक्रवार (१ ते ८ ऑगस्ट) या कालावधीत होणार आहे. ही माहिती माहिती संस्थेचे कार्यवाह बी. बी. दोशिंगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि शारदा वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षा व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे ४७ वे वर्ष असून येथील लाल बहादूर शास्त्री भवनामध्ये दररोज सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होणार आहेत. व्याख्यानमालेच उद्घाटन वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते होणार आहे.
तारीखवार व्याख्यान असे
१ ऑगस्ट – गुरुवर्य भालचंद्र पाटील यांचे गुरुचरित्रातून गुरुआज्ञा,
२ ऑगस्ट – प्रमोद झावरे यांचे हास्य फुलवते मानवी जीवन,
३ ऑगस्ट – सुषमा पाटील यांचे आई संस्काराचे विद्यापीठ,
४ ऑगस्ट – अजय सावंत यांचे सायबर क्राईम : आजची तरुणाई,
५ ऑगस्ट – युवराज कदम यांचे जिंदगी गेली फाट्यावर, चला आता वाचन कट्ट्यावर,
६ आँगस्ट – जयसिंगराव सावंत यांचे तणावमुक्त जीवन,
७ ऑगस्ट – उमेश सुतार यांचे भारतीय संविधानाचा सांगावा,
८ ऑगस्ट – एन. आर. चोपडे यांचे वारणेच्या तीरावरून.
व्याख्यानमालेला रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दोशिंगे यांनी केले. पत्रकार परिषदेला वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव, ग्रंथपाल ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे आदी उपस्थित होते.
————————————————————————————–



