कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
देशातील विविध कामगार संघटना विविध मागण्यासाठी उद्या ९ जुलैला संपावर जाणार असून या संपात बँक कर्मचारी सहभागी होणार आहेत यामुळे बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. १० केंद्रीय कामगार संघटना, त्यांच्या संलग्न संघटना, बँकिंग, विमा, टपाल, कोळसा खाण, महामार्ग, बांधकाम, राज्य वाहतूक हे सर्व संपावर आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, बंगाल प्रोव्हिन्शियल बँक एम्प्लॉईज असोसिएशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, बेफी, एआयटीयूसी, एचएमएस, सीटू, आयएनटीयूसी, एआययूटीयूसी, टीयूसीसी, सेवा, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी या संघटना संपात सहभागी होत आहेत.
कर्मचाऱ्यांच्या संपात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्र, पोस्टल विभाग, कोळसा आणि कारखाना, राज्य वाहतूक, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील अनेक कर्मचारी सहभागी होतील यामुळे या कार्यालयातील काम थांबेल. मात्र शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बसेस, रेल्वे, विमानतळ, बाजारपेठ, रुग्णालये यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. त्याच वेळी, खाजगी कार्यालये, मॉल, बाजारपेठ इत्यादी सर्व खुले राहतील.
———————————————————————————–