प्रसारमाध्यम डेस्क :
अंडर १९ क्रिकेटमध्ये सध्या वैभव सूर्यवंशीची चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या युथ टेस्टमध्ये त्याने झंझावाती शतक ठोकलं. पण आता दुसऱ्या युथ टेस्टमध्ये वैभव सूर्यवंशी नसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
युथ कसोटी मालिकेसाठी भारताचा १९ वर्षाखालील संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून पहिला कसोटी सामना भारताने जिंकला आहे. या कसोटी सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा झंझावात पाहायला मिळाला. या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरणार यात काही शंका नाही. पण चांगली कामगिरी करू शकेल की नाही याबाबत शंका व्यक्त जात आहे.
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्द मल्टी डे मालिका खेळल्या आहेत. आता तिसरी मालिका खेळत आहे. वैभव सूर्यवंशी आतापर्यंत पाच मल्टी डे कसोटी सामने खेळला आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ आणि इंग्लंडविरुद्ध २ सामने आहेत. यात त्याने २ शतकांसह ३११ धावा केल्या असून त्याची सरासरी ३८.८७ आहे. तीन मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी दमदार राहिली आहे. वैभव सूर्यवंशीने ५७.६० च्या सरासरीने २८८ धावा केल्या. पण मालिकेच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये त्याने ७.६६ च्या खराब सरासरीने फक्त २३ धावा केल्या आहेत.