वॉशिंग्टन : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ जुलै २०२५ रोजी “One Big Beautiful Bill” (ओबीबीबीए) या महत्त्वपूर्ण कायद्यावर स्वाक्षरी केली. या नव्या कायद्याअंतर्गत, २०२६ पासून अमेरिकेत प्रवेश घेणाऱ्या नॉन-इमिग्रंट व्हिसा धारकांना $250 (अंदाजे ₹21,400) इतकी अतिरिक्त फी भरावी लागणार आहे. याला ‘व्हिसा इंटिग्रिटी फी’ असे नाव देण्यात आले असून ही रक्कम मूळ व्हिसा शुल्काव्यतिरिक्त असेल. याची भारतीय पर्यटक, विद्यार्थ्यांवर आणि तंत्रज्ञान कामगारांवर थेट परिणाम होणार आहे.
काय आहे ‘व्हिसा इंटिग्रिटी फी’?
-
ही नॉन-रिफंडेबल, म्हणजे परत न होणारी फी आहे.
-
सर्व प्रकारच्या नॉन-इमिग्रंट व्हिसांवर (B1/B2, F, M, H-1B, J इ.) ही लागू होणार आहे.
-
अमेरिकन सरकारचा दावा आहे की, ही फी प्रणालीतील पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी लावली जात आहे.
भारतीयांसाठी काय परिणाम ?
व्हिसा प्रकार | सध्याची फी | नव्या फी सहित खर्च (2026 पासून) |
---|---|---|
B1/B2 (पर्यटक) | ₹ १६,००० | ₹ ४०,०००+ |
F1/M (विद्यार्थी) | ₹ १४,००० | ₹ ३५,०००+ |
H-1B (नोकरी) | ₹ २५,००० + | ₹ ५०,०००+ |
२०२६ पासून व्हिसा अर्ज करताना या अतिरिक्त शुल्कामुळे भारतातील अर्जदारांवर अधिक आर्थिक भार पडणार आहे.
फी लागू कधी होणार?
ही फी १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे २०२५ अखेरपर्यंत अर्ज करणाऱ्यांना ती लागू होणार नाही. परिणामी अनेक भारतीय उमेदवार आता लवकर अर्ज करण्याचा विचार करत आहेत.
ट्रम्प प्रशासनाचा उद्देश काय ?
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, व्हिसा प्रणालीतील गैरवर्तन थांबवणे, ओव्हरस्टे (व्हिसा कालावधी न वाढवता अमेरिका न सोडणे ) प्रकरणे कमी करणे आणि अमेरिकन सुरक्षेला बळकटी देणे, हे या कायद्यामागचे प्रमुख हेतू आहेत.
तज्ज्ञांचे मत
प्रवास तज्ज्ञ अजय देशमुख म्हणाले, “ही फी शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका देणारी ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि मध्यमवर्गीय घरांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो.”
व्हिसा इंटिग्रिटी फी’ ही अमेरिकेच्या व्हिसा धोरणातील मोठी आर्थिक अडथळा ठरणार आहे. भारतासारख्या देशातील लाखो प्रवासी, विद्यार्थी आणि कामगारांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. इच्छुक अर्जदारांनी वेळेत अर्ज करून अतिरिक्त शुल्क वाचवण्याची संधी गमावू नये.
——————————————————————————————–