पन्हाळा : प्रतिनिधी
“शासकीय अधिकाऱ्यांवर देशाची प्रतिमा ऊंचवण्याची मोठी जबाबदारी असते. ज्यावेळी देश युद्धजन्य परिस्थितीमध्ये असतो त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. मिशन सिंधूर मध्ये एस जयशंकर यांनी विशेष भूमिका बजावत जगाला आपल्या देशाची बाजू कशी योग्य आहे, हे समजावून सांगितले तसेच देशाचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोबाल हे देखील प्रशासकीय सेवेत होते त्यांचे देखील सुरक्षा व्यवस्थेत योगदान असून त्या पद्धतीने आता यूपीएससीत उत्तीर्ण झालेल्यांची जबाबदारी आहे.” असे वारणा समुहाचे नेते डॉ.विनय कोरे यांनी सांगितले. ते वारणानगर येथे सुराज्य फौडेंशनमार्फत आयोजित केलेल्या व्हिजन २०२५ या गौरव सोहळयात युपीएससी परिक्षेतील यशस्वी गुणवंताच्या सत्कार समारंभात बोलत होते.
सुराज्य फौंडेशनच्यावतीने व्हीजन २०२५ युपीएससी परिक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ वारणानगर येथे आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन.एच. पाटील यांनी, “चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी नेहमी जवळ बाळगा आणि यश मिळवायचे असेल तर योग्य बंधनात राहिले पाहिजे”, असे सांगितले. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी परिक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या यशवंतांचा गौरव वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे अध्यक्ष आणि आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी २० हून अधिक यूपीएससीत यशस्वी झालेले यशवंत उपस्थित होते. या गौरव सोहळयात आयएएस यशवंतांनी केलेली मनोगते व्यक्त करत त्यांनी परीक्षा उत्तीर्ण होताना झालेला प्रवास विषद करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यूपीएसी अभ्यास करू इच्छितात त्यांनी आत्मविस्वास ठेवा आणि मोठी स्वप्न बघा तसेच परिक्षा संदर्भात कोणताही चूकीचा न्यूनगंड न बाळगतात अशा परीक्षांना मोठ्या धैर्याने सामोरे गेल्यास आपण यशस्वी होऊ शकता अस सांगितले.
यावेळी आमदार अशोकराव माने, सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, वारणा साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, गोकुळचे संचालक करणंसिह गायकवाड, वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी,वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, जीवनकुमार शिंदे यांच्यासह वारणा समुहातील पदाधिकारी, विद्यार्थी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.