नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताची सर्वात लोकप्रिय डिजिटल पेमेंट सिस्टीम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ( UPI ) लवकरच ATM प्रमाणे वापरण्याची सुविधा देऊ शकते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ( NPCI ) ने भारतीय रिझर्व्ह बँक ( RBI ) कडे २० लाखांपेक्षा जास्त बँकिंग कॉरेस्पॉन्डंट ( BC ) आउटलेट्सवर UPI द्वारे QR कोड स्कॅन करून रोख काढण्याची सुविधा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याऐवजी बहुतेक जण आता ATM ला प्राधान्य देतात. कारण, ATM २४ तास उपलब्ध असून कोणत्याही दिवशी किंवा वेळी पैसे काढणे शक्य होते. मात्र, अनेकदा ATM मध्ये रोख रक्कम नसणे, तांत्रिक बिघाड, लांब रांगा किंवा घराजवळ सुविधा नसणे यासारख्या अडचणी येतात. आता ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे.
पैसे काढण्याची प्रक्रिया (Step-by-step guide)
ही प्रणाली सोपी आणि जलद असेल. ग्राहक खालील पद्धतीने पैसे काढू शकतील
-
मोबाईलवरील UPI ॲप उघडणे.
-
BC आउटलेटने दिलेल्या QR कोडला स्कॅन करणे.
-
पैसे काढण्यासाठी UPI पिन वापरून व्यवहार अधिकृत करणे.
-
व्यवहार पूर्ण होताच ग्राहकांना ताबडतोब रोख रक्कम मिळेल.