spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

HomeUncategorizedUPI वरुन तुमचं डिजिटल पेमेंट होत नाहीय का..?

UPI वरुन तुमचं डिजिटल पेमेंट होत नाहीय का..?

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

युपीआय ग्राहकांसाठी मोठी बातमी

भारतात UPI सर्व्हर पुन्हा एकदा डाऊन झाला आहे. त्यामुळे शनिवार सकाळपासून डिजिटल पेमेंट करताना लोकांना अडचणी येत आहेत. यूपीआयमध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो युजर्स डिजिटल पेमेंट करु शकत नाहीयत. अचानक झालेल्या या बिघाडामुळे PhonePe, Google Pay आणि Paytm द्वारे देण्या-घेण्याचे व्यवहार करणारे सर्वसामान्य आणि व्यापारी हैराण झाले आहेत. DownDetector च्या आकड्यांनुसार दुपारपर्यंत जवळपास 1,168 तक्रारी यूपीआय सर्व्हीस बद्दल नोंदवण्यात आल्या आहेत. यात Google Pay वर 96 आणि Paytm वर 23 यूजर्सनी अडचणी येत असल्याची माहिती दिली आहे. यूपीआयकडून या बद्दल अजूनपर्यंत कुठलही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. पण मागच्या काही दिवसात यूपीआय डाऊन होण्याच प्रमाण प्रचंड वाढलं आहे.

याआधी 26 मार्चला सुद्धा यूपीआय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्निकल बिघाड झाला होता. त्यामुळे वेगवेगळ्या UPI APPS वरुन जवळपास 2 ते 3 तास ट्रांजॅक्शन करता आलं नव्हतं. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया या समस्येच कारण टेक्निक्ल प्रॉब्लेम असल्याच सांगितलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य यूजर्स आणि व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंटमध्ये अडचण आली होती.

अशावेळी समोरच्याला पैसे कसे द्यायचे?

सध्या भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. कॅशचा वापर कमी होऊन UPI वरील अवलंबित्व वाढलं आहे. अशा स्थितीत एखाद्या दुकानात वस्तू विकत घेतल्यानंतर पेमेंट होत नसेल, UPI डाऊन दाखवत असेल तर ग्राहकाला मोठा झटका बसतो. कराण डिजिटल पेमेंट होईल म्हणून बँकेच्या एटीएममधून कॅश काढलेली नसते. अशावेळी समोरच्याला पैसे कसे द्यायचे हा प्रश्न निर्माण होतो.

सध्या UPI कशामुळे डाऊन आहे, ते नेमकं कारण NPCI ने सांगितलेलं नाही. पण लाखोंचे व्यवहार यामुळे ठप्प होऊन बसले आहेत. भारतात जी पे, फोन पे आणि पेटीएम वरुन पेमेंट करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लाखो रुपयांच्या वस्तूपासून ते पाच-दहा रुपयापर्यंतच्या वस्तुसाठी डिजिटल पेमेंट केलं जातं.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments