प्रसारमाध्यम डेस्क:
सध्या शेअर बाजारात अस्थिरतेचं वातावरण असलं तरी तंत्रज्ञान, वित्त आणि ऑटो क्षेत्रात ठोस वाढीची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर एका नामांकित ब्रोकरेज फर्मने अशा ५ शेअर्सची निवड केली आहे जे मध्यम ते दीर्घ मुदतीत गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात. कंपन्यांच्या कामगिरी, डील पाइपलाइन, तांत्रिक प्रगती आणि वाढीच्या रणनीतींच्या आधारे लक्ष्य किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत.
१. इन्फोसिस (Infosys)
लक्ष्य किंमत : ₹२,१५०
AI-आधारित सेवा अंमलबजावणीत मोठी संधी पाहणाऱ्या इन्फोसिसने आपल्या ऑपरेशनल कार्यक्षमतेला अधिक धार दिली आहे.उद्योग हार्डवेअर-केंद्रित AI पासून सर्व्हिस-ड्रिव्हन AI कडे वळत आहे.इन्फोसिसची AI स्टॅक आणि पूर्ण-स्टॅक सेवा पोर्टफोलिओला मोठी मागणी.
कंपनीने महसूल मार्गदर्शन दोनदा वाढवलं — मागणी मजबूत असल्याचं संकेत.ऑपरेटिंग मार्जिन २१% च्या आसपास राहण्याची शक्यता.एंटरप्राइझ AI च्या पुढील टप्प्यात इन्फोसिसकडे उत्तम वाढीची क्षमता दिसत आहे.
२. एचसीएल टेक (HCL Tech)
लक्ष्य किंमत : ₹२,१५०
सप्टेंबर तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.महसुलात २.४% वाढ आणि EBIT मार्जिन १७.४%.२.६ अब्ज डॉलरची मजबूत डील बॅग.AI ऑफरिंग्जचा महसुलातील वाटा ३% पर्यंत वाढला.४७ क्लायंट्ससाठी AI प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी.अट्रिशन कमी आणि उत्पादनक्षमता वाढल्यामुळे भविष्यातील व्हिजिबिलिटी अधिक मजबूत.सध्या HCL Tech ही सर्वात वेगाने वाढणारी लार्ज-कॅप आयटी सेवा कंपनी मानली जात आहे.
३. महिंद्रा अँड महिंद्रा (M&M)
लक्ष्य किंमत : ₹४,२७५
ऑटो आणि फार्म सेगमेंटमध्ये मोठ्या वाढीची रणनीती कंपनीने आखली आहे.२०२९-३० पर्यंत SUV व LCV मध्ये ८ पटफार्म सेगमेंटमध्ये ३ पट वाढीची अपेक्षा,वाढीचं लक्ष्य.NU-IQ प्लॅटफॉर्म, XEV 9S सारखे इलेक्ट्रिक वाहनांचे लॉन्च २०२७ नंतर वाढीस चालना देणार,लास्ट माईल मोबिलिटी, ट्रक्स-बस, हॉलिडेज, लाईफस्पेस अशा विभागांमध्ये जलद विस्तार.ROE १८% देणाऱ्या नवीन बिझनेस लाइनमध्ये प्रवेशाची शक्यता,ऑटो उद्योगातील तेजी आणि EV धोरणांमुळे M&M गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरत आहे.
४. एल अँड टी फायनान्स (L&T Finance)
लक्ष्य किंमत : ₹३३०
कंपनीने AI-आधारित कर्ज अंडररायटिंगमुळे उत्कृष्ट क्रेडिट गुणवत्ता साध्य केली आहे,मायक्रोफायनान्स, दोन चाकी आणि शेतकरी वित्त विभागात जोरदार वाढ,२०–२५% वर मालमत्ता व्यवस्थापनातील वाढीचं लक्ष्य,रिटर्न ऑन ॲसेट्स (RoA) ३% पर्यंत नेण्याची योजना.किरकोळ कर्ज वितरण आणि तंत्रज्ञान-आधारित प्रक्रियांमुळे L&T Finance भविष्यात दमदार कामगिरी करू शकते.
किरकोळ कर्ज वितरण आणि तंत्रज्ञान-आधारित प्रक्रियांमुळे L&T Finance भविष्यात दमदार कामगिरी करू शकते.
५. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
लक्ष्य किंमत : ₹१,०७५
देशातील सर्वात मोठ्या बँकेने क्रेडिट वाढ आणि मालमत्ता गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला आहे.रिटेल, SME आणि कॉर्पोरेट सेगमेंटमध्ये १३% वार्षिक क्रेडिट वाढ,मजबूत ठेवी संकलन — बँकेची स्थिरता वाढवणारा घटक,ग्रॉस NPA फक्त १.८%, तरतूद कव्हरेज ७९% पर्यंत सुधार,सरकार-नेतृत्वित गुंतवणूक आणि MSME कर्ज वाढीमुळे नफा वाढण्याची शक्यता,FY27E साठी RoA १.१% आणि RoE १५.५% चा अंदाज.
अस्थिर बाजाराला तोंड देताना तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांची मूलभूत स्थिती मजबूत असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. या पाच शेअर्समध्ये दीर्घकालीन वाढीचे स्पष्ट संकेत दिसत असून गुंतवणूकदारांसाठी ते आकर्षक पर्याय ठरू शकतात.





