The prize distribution ceremony of the Kolhapur District Level and Chandgad Taluka Level Poetry Singing Competition-2025 was held in Shinoli Khurd.
चंदगड : प्रसारमाध्यम न्यूज
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीने आणि माजी शिक्षक आमदार मा. दत्तात्रय अच्युतराव सावंत यांच्या प्रेरणेतून आयोजित कोल्हापूर जिल्हास्तरीय व चंदगड तालुकास्तरीय काव्य गायन स्पर्धा-२०२५ चा पारितोषिक वितरण सोहळा शिनोळी खुर्द येथे दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थान तालुका संघाचे मॅनेजर एस. वाय. पाटील यांनी भूषवले. प्रास्ताविकात एम. एन. शिवणगेकर यांनी अध्यापक संघाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. अध्यक्ष मोहन पाटील व मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आमदार दत्तात्रय सावंत – विद्यार्थ्यांच्या सुप्तकलांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त आहेत.विद्यार्थ्यांच्या काव्य गायनातून सर्जनशीलतेचा नवा वाव देवून चंदगड मराठी अध्यापक संघाने संपूर्ण राज्यात नवा पायंडा पाडला आहे.
कु. हर्षिता निकम हिने “अनामवीरा” ही काव्यरचना मधुर स्वरात सादर केली, तर देवयानी पाटील हिने “धरलेल्या पंढरीचा चोर” हा अभंग सादर केला.
मान्यवर – सोलापूर मराठी अध्यापक संघ अध्यक्ष राजेंद्र आसबे, जिल्हा संपर्कप्रमुख समाधान घाडगे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे सचिव बी. डी. तुडयेकर, कोलीकचे मुख्याध्यापक गुलाब पाटील , अमरोळी मुख्याध्याप व्ही. के. फगरे , शिनोळी बु विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. टी. भाटे , खजिनदार व्ही. एल. सुतार एस पी पाटील , प्रा.मासाळ तसेच अनेक शाळांचे मुख्याध्यापक , प्राध्यापक व अध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी रवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आभारप्रदर्शन राघवेंद्र इनामदार यांनी केले.