प्रसारमाध्यम डेस्क : अमोल शिंगे
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचा किल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समवेश करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील दिसून येत आहे. मार्च महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळा गडावरील एका कर्यक्रमात पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समवेश करण्याची ग्वाही दिली होती. यानुसार शासन स्तरावर तसे प्रयत्न देखील सुरु झाले मात्र पन्हाळा गडावरील नागरिकांमध्ये याबद्दल नाराजी निर्माण झाली आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळ्याचा समावेश झाल्यास स्थानिकांवर विविध निर्बंध लादले जातील, अशी स्थानिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. जागतिक वारसा स्थळांची यादी म्हणजे काय? त्याचे काय निकष असतात? असे काही प्रश उपस्थित होत असून याबद्दल स्थानिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहेत. आपण प्रसारमाध्यमच्या माध्यमातून जागतिक वारसा स्थळांच्या एकूणच प्रक्रियेची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
आपण पहिल्यांदा जागतिक वारसा स्थळांचा वारसा म्हणजे काय ते जाणून घेऊ. ‘मानवजातीने निर्माण केलेल्या किंवा निसर्गदत्त असलेल्या अशा विशेष ऐतिहासिक, सांस्कृतिक, वास्तूशास्त्रीय किंवा निसर्गवैज्ञानिक महत्त्वाच्या स्थळांचा संच, जे युनेस्को (UNESCO) या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे जागतिक महत्त्वाचे म्हणून मान्यता प्राप्त करतात आशा स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समवेश केला जातो. या स्थळांची निवड UNESCO म्हणजेच UNITED NATIONS EDUCATIONAL SCINTIFIC AND CULTURAL ORGANIZATION या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत केली जाते. ज्या देशाला त्यांच्या देशातील स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समवेश करावयाचा असतो तो देश UNESCO निवडलेल्या स्थळांचा सविस्तर अहवाल सादर करतो. या अहवालात त्या स्थळांचे ऐतिहासिक महत्व, देखभाल योजना आणि जागतिक मुल्य यांचा समावेश असतो. UNESCO कडे या नामांकनाचा अहवाल सादर झाल्यानंतर सांस्कृतिक स्थळांना ICOMOS (INTERNATINOL COUNCIL ON MONUMENTS AND SITES) आणि नैसर्गिक स्थळांसाठी IUCN (INTERNATIONAL UNION FOR CONSERVATION OF NATURE ) या दोन तज्ञ समित्यांकडून संबंधित स्थळांचे परिक्षण केले जाते.
या यादीत निवड होण्यासाठी UNESCO ने स्थळांसाठी १० निकष ठेवले आहेत. सांस्कृतिक महत्व, नैसर्गिक वैशिष्ट्य आणि अद्वितीय वास्तुकला, तंत्रज्ञान किंवा इको सिस्टीम हे काही प्रमुख निकष आहेत.
भारतातील कोणत्या स्थळांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समवेश आहे?
ताजमहाल ( आग्रा )
अजंठा वेरूळ लेणी ( महाराष्ट्र )
सॉचीचे स्तूप ( मध्यप्रदेश )
कांझीरंगा ( आसाम )
पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समवेश करण्याचा प्रस्ताव ‘मराठा लष्करी लँडस्केप’ या नामांकित गटाचा भाग म्हणून सादर करण्यात आला आहे. भारत सरकारने सन २०२४ – २५ या वर्षासाठी पन्हाळा गडाचा UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा म्हणून २९ जानेवारी २०२४ रोजी नामांकन म्हणजेच प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव सादर झाल्यापासून पन्हाळा गडवासियांमध्ये विस्थापन होण्याच्या शक्यतेने पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्यास विरोध आहे. या यादीत पन्हाळा गडाचा समावेश झाल्यास बहुतांश नागरिकांना, व्यापाऱ्यांना विस्थापित व्हावे लागेल अशी भिती त्यांच्यात निर्माण झाली आहे. ही भिती योग्य आहे का? तर हो… युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वारसा स्थळाचे मूळ सौंदर्य, सांस्कृतिक किंवा निसर्गवैशिष्ट्ये अबाधित ठेवणे गरजेचे असते त्यामुळे अनधिकृत वस्ती किंवा अतिक्रमणे हटवली जाऊ शकतात. मोठी इमारत, कारखाना इत्यादी नव्या विकासकामांवर बंदी येऊ शकते. काही वेळा रहिवाशांना विस्थापित होण्यास सांगितले जाऊ शकते. हा संभ्रम दूर करण्यासाठीच काही दिवसांपूर्वी पन्हाळा गडवासीय आणि जिल्हाधिकारी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी गडवासियांना विचारात घेतल्याशिवाय पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती मात्र याबाबतीत राज्य शासनाची भुमिका पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्याच्या बाजूने खूपच सकारात्मक दिसत आहे. मे महिन्यात पन्हाळा गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.